महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हळदी-कुंकू कार्यक्रमात नागरिकत्व कायद्याची जनजागृती - caa

पिंपरी चिंचवड शहरातील मसुळकर वसाहतीत हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त महिलांना कायद्याच्या माहितीच्या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.

हळदी-कुंकू कार्यक्रमात नागरिकत्व कायद्याची जनजागृती
हळदी-कुंकू कार्यक्रमात नागरिकत्व कायद्याची जनजागृती

By

Published : Jan 30, 2020, 1:07 PM IST

पुणे - सध्या देशभर राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याचा (सीएए) विरोध होत आहे. तर, दुसरीकडे भाजप कार्यकर्ते या कायद्याचा प्रचार आणि प्रसार करताना दिसत आहेत. यातच, पिंपरी चिंचवड शहरातील मसुळकर वसाहतीत हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त महिलांना कायद्याच्या माहितीच्या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.

हळदी-कुंकू कार्यक्रमात नागरिकत्व कायद्याची जनजागृती

भाजप कार्यकर्त्यांचा एनआरसी आणि सीएएच्या समर्थनार्थ जोरदार प्रचार-प्रसार सुरू आहे. संक्रातीनिमित्ताने पिंपरी चिंचवड शहरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी, भाजपच्या महिला कार्यकर्त्या विणा सोनवळकर यांनी घरगुती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

हेही वाचा -विद्या बाळ यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या सामाजिक वर्तुळातील एक मोठा तारा निखळला - सुप्रिया सुळे

यावेळी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात महिलांना वाण स्वरुपात सीएए आणि एनआरसी कायद्याच्या माहिती पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. सीएए आणि एनआरसी कायद्याबद्दल जनजागृती व्हावी अशी यामागची भावना होती, असे सोनवळकर यावेळी बोलताना म्हणाल्या.

हेही वाचा -'मिळून साऱ्याजणी'च्या संस्थापक अन् ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन

ABOUT THE AUTHOR

...view details