पुणे- कोरोनाच्या लढ्यात अनेक जण आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. अनेक सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती गोर-गरिबांना मदत करत आहेत. ज्यांना जसे शक्य होईल तसे, या महासंकटात लोक मदत करत आहेत. पुण्यातील मांजरी परिसरातील सॉफ्टवेअर अभियंता सुनील चंद्रे हा तरुण रस्त्यावर 'स्लोगन'च्या माध्यमातून कोरोनाविषयी जनजागृती करत आहे.
सॉफ्टवेअर अभियंत्याची रस्त्यावर 'स्लोगन' लिहून कोरोनाबाबात जनजागृती... - pune corona news
पुण्यातील मांजरी परिसरातील सॉफ्टवेअर अभियंता सुनील चंद्रे हा तरुण रस्त्यावर 'स्लोगन'च्या माध्यमातून कोरोनाविषयी जनजागृती करत आहे.
ठेवुया सुरक्षित अंतर..कोरोना होईल छू मंतर, आपल्या सोन्या सारख्या गावाला जपा, नियम पाळा, कोरोना टाळा अशा पद्धतीचे स्लोगन विविध रस्त्यांवर लिहून हा तरुण कोरोनाबाबत जनजागृती करत आहे. हा तरुण सध्या घरातूनच काम करत आहे. काम सांभाळून सुनील शहरातील विविध रस्त्यांवर असे संदेश लिहून कोरोनाविषयी जनजागृती करत आहे. या कामात त्याचे मित्र त्याला मदत करतात.
लॉकडाऊनचे गांभीर्य नसल्यामुळे काही लोक घराबाहेर पडत आहेत. आपण प्रशासनाला सहकार्य करावे, म्हणून मी माझ्यातर्फे एक छोटासा प्रयत्न म्हणून शनिवारी-रविवारी मांजरी भागातील विविध ठिकाणी रस्त्यावर स्लोगन लिहिले आहेत. जेणेकरून लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी व कोरोना सारख्या महामारीवर लवकरात लवकर मात मिळविण्यासाठी आपल्या सर्वांना यश यावे, हाच माझा ह्या मागचा एक छोटासा प्रयत्न आहे, अशी माहिती सुनील चंद्रे यांनी दिली.