पुणे- चाकण ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहाची भिंत कोसळून सहा महिने उलटले आहेत. मात्र अद्यापही या शवविच्छेदन गृहाची भिंत बांधण्यात आलेली नाही. त्यामुळे पडत्या पावसातच शवविच्छेदन गृहात काम केले जात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ग्रामीण रुग्णालयाची भिंत कोसळल्याने उघड्यावरच होते शवविच्छेदन; नागरिकांचे हाल - शवविच्छेदन
ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहाची भिंत कोसळून सहा महिने उलटले आहेत. मात्र, अद्यापही या शवविच्छेदन गृहाची भिंत बांधण्यात आलेली नाही.

मृत्यूचे कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन केले जाते. त्यासाठी शवविच्छेदन रुग्णालयाच्या बाजुला बंद ठिकाणी केले जाते. मात्र सध्या चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातील शवविच्छेदन विभागाची खोली मागील बाजुची भिंत सहा महिन्यापुर्वी पडलेली आहे. या खोलीत उघड्यावरच शवविच्छेदन केले जात आहे. याकडे रुग्णालय व्यवस्थापनाचे दुर्लक्ष झाले आहे.
चाकण ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन विभागात रोज किमान एक शवविच्छेदन केले जाते. त्यातून मागील बाजु उघडी असल्याने आजुबाजुला असणाऱ्या नागरिकांना याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे.