महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज उचलणाऱ्या संजय शिंदेंवर कारवाईची मागणी - संजय शिंदेंनी शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज घेतले

करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या विठ्ठल कार्पोरेशन साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज उचलल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शिंदेंवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. या मागणीसाठी पुण्यातल्या पंजाब नॅशनल बँकेच्या कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांनी अर्धनग्न होत भीक मागो आंदोलन केले. शिवाय, संजय शिंदेंवर कारवाई न केल्यास ईडी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारीही देण्यात आला आहे.

PUNE
पुणे

By

Published : Jun 16, 2021, 5:10 PM IST

Updated : Jun 17, 2021, 5:52 PM IST

पुणे - करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या विठ्ठल कार्पोरेशन साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज उचलल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शिंदेंवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. याच मागणीसाठी बुधवारी (16 जून) पुण्यातल्या पंजाब नॅशनल बँकेच्या कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांनी अर्धनग्न होत भीक मांगो आंदोलन केले.

हेही वाचा-नवरा इंजिनिअर, पगार १.५ लाख, तरीही बायकोने रचला १ Cr खंडणीचा कट

'१५०० शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज काढले'

'सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या विठ्ठल कॉर्पोरेशन साखर कारखान्याकडून २०१३मध्ये खत देतो म्हणून शेतकऱ्यांकडून आधार कार्ड, मतदान कार्ड तसेच सातबारा उतारा आणि अनेक ठिकाणी सह्या घेण्यात आल्या. मात्र संबंधित शेतकऱ्यांना खत मिळाले नाही. या माध्यमातून आमदार संजय शिंदेंनी १५०० शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज काढले आहे', असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

हेही वाचा-हातावर मेहंदी लागन्याआधीच कोरोनाने केला घात, आईनंतर अवघ्या १० दिवसांत मुलीचंही निधन

शेतकऱ्यांचे भीक मागत अर्धनग्न आंदोलन

'२०१३पासून आतापर्यंत कारखाना आणि बँकेची कोणतीही नोटीस कर्ज भरण्यासंदर्भात आली नाही. मात्र, यावर्षी २९ मे नंतर पंजाब नॅशनल बँकेच्या वकिलांकडून पोस्टाने नोटीस पाठवून कर्जाची रक्कम २ मे पर्यंत भरावी अन्यथा, फौजदारी कारवाई करावी लागेल. असा इशारा वकिलामार्फत पाठविलेल्या नोटिशीत देण्यात आला. यामुळे शेतकरी चक्रावले. कुठले कर्ज? याची जाणीवही शेतकऱ्यांना नव्हती. त्यामुळे शेतकरी या संदर्भात कारवाईची मागणी करत आहेत. त्यासाठी बुधवारी पुण्यातल्या पंजाब नॅशनल बँकेबाहेर शेतकरी आले. आक्रमक होत या शेतकऱ्यांनी भीक मागत अर्धनग्न आंदोलन केले.

हेही वाचा-सोनू सुदला मुंबई हायकोर्टाने फटकारले, "संकटकाळात तुम्ही एखादा देवदूत असल्यासारखा वावर होता"

ईडी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांना फसवणाऱ्या संजय शिंदे यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. शिवाय, कारवाई झाली नाही तर ईडी कार्यलायवर उपोषण करण्याचा इशारा शेतकरी आंदोलनकर्ते अतुल खुपसे यांनी यावेळी दिला.

हेही वाचा -शेतकऱ्यांनो पेरणीसाठी चांगल्या पावसाची आणखी वाट पाहा - कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. भाले

Last Updated : Jun 17, 2021, 5:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details