महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खेड-आळंदी विधानसभेतुन भाजपच्या अतुल देशमुखांची बंडोखोरी कायम; अपक्ष लढणार - महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2019

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात भाजपचे जिल्हा परिषद सदस्य व तालुका अध्यक्ष अतुल देशमुख यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा व तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन अपक्ष म्हणुन उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे खेड-आळंदी विधानसभेत तिरंगी लढत पहायला मिळणार आहे.

अतुल देशमुख

By

Published : Oct 7, 2019, 7:45 PM IST

Updated : Oct 7, 2019, 11:48 PM IST

पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी भरलेले अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज माघारीच्या दिवशीही युतीच्या अनेक बंडोखोर नेत्यांनी आपले दंड थोपटत विधानसभेच्या मैदानात अपक्ष म्हणुन तयारी केली आहे. खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात भाजपचे जिल्हा परिषद सदस्य व तालुका अध्यक्ष अतुल देशमुख यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा व तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन अपक्ष म्हणुन उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे खेड-आळंदी विधानसभेत तिरंगी लढत पहायला मिळणार आहे.

अतुल देशमुख यांची प्रतिक्रिया

खेड तालुक्यात मागील पाच वर्षात भाजपाने एक वेगळे स्थान निर्माण करत आळंदी, राजगुरुनगर नगरपरिषद व दोन जिल्हा परिषद गट व पंचायत समिती यामध्ये स्वतंत्र सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले आहे. तरुणांचे प्रेरणास्थान म्हणुन अतुल देशमुख यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे दिवसेंदिवस खेड तालुक्यात भाजप वाढत असताना मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेला भाजप विरोधक वाटत असल्याने मागील निवडणुकांमध्ये शिवसेना व भाजप स्वतंत्र लढले. आता विधानसभेत युती झाल्याने खेड आळंदी विधानसभेची जागा शिवसेनेकडे गेली आहे. यामुळे या गटातुन भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी माघार न घेता अपक्ष हा पर्याय घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहे.

हेही वाचा -मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर मावळमधील भाजप बंडखोर थंडावले

आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, या मतदारसंघातुन अतुल देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना व अपक्ष अशी लढत पहायला मिळणार आहे.

जुन्नर विधानसभा मतदारसंघ

1)अतुल बेनके राष्ट्रवादी काँग्रेस
2)शरद सोनवणे शिवसेना
3)आशा बुचके - अपक्ष

आंबेगाव विधानसभा मतदारसंघ

1)दिलीप वळसे पाटील -राष्ट्रवादी काँग्रेस
2)राजाराम बाणखिले -शिवसेना

हेही वाचा -पुणे जिल्ह्यात 'बंडोबा' होणार का 'थंडोबा'..?

खेड विधानसभा मतदारसंघ

1)दिलीप मोहिते-राष्ट्रवादी काँग्रेस
2)सुरेश गोरे - शिवसेना
3)अतुल देशमुख- भाजप बंडखोर

शिरूर विधानसभा मतदारसंघ

1)बाबुराव पाचर्णे- भाजप

2)अशोक पवार- राष्ट्रवादी काँग्रेस
3)कैलास नरके -मनसे

Last Updated : Oct 7, 2019, 11:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details