महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी बैलगाडा शर्यती खुल्या करणार' - राजगुरुनगरमधील बैलगाडा शर्यती

अतुल देशमुख भाजपमधून बाहेर पडून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यासाठी राजगुरुनगर येथे त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी बैलगाडा शर्यती सुरू करणार असल्याचे सांगितले.

अतुल देशमुख

By

Published : Oct 19, 2019, 11:49 AM IST

पुणे - आम्ही सर्वजण शेतकरी कुटुंबातील मुले आहोत. आम्हाला काही नको. मात्र, या भागातील बैलगाडा शर्यत बंद आहे. बैलगाडा शर्यत बंदीविरोधात आंदोलने केली जातात. आमदार मात्र पोलिसांच्या भीतीने पळपुटेपणा करतात. मात्र, आता घाबरू नका 'मी आमदार झाल्यावर बैलगाडे खुशाल पळवा. कुणाला घाबरायची गरज नाही. माझ्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील. मी खोट्या गुन्ह्यांना घाबरत नाही' असे वक्तव्य अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांनी केले. राजगुरुनगर येथील त्यांच्या जाहीर सभेत ते बोलत होते.

'माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी बैलगाडा शर्यती खुल्या करणार'

अतुल देशमुख हे भाजपमधून बाहेर पडून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. निवडणुका आल्या की अनेकजण आश्वासनांचा पाऊस पाडतात. जनतेची दिशाभूल केली जाते. मात्र, खेड तालुक्यात अद्यापही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. बेरोजगारी वाढत आहे. स्थानिक मुलांमध्ये काम करण्याची क्षमता आणि शिक्षण असताना देखील स्थानिकांना कामे दिली जात नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी, काँग्रेसच्या या आमदारांना कुटुंबातील सदस्यांसाठी एमआयडीसी पाहीजे असल्याचे ते म्हणाले. आमदार सुरेश गोरे गेल्या ५ वर्षांपासून विधीमंडळात काय करत होते? झोपा काढत होते का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपचार केला.

सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या व्यक्तीला शेतकरी जनता डोक्यावर घेते. आता तुमच्यासमोर शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून अतुल देशमुख हा सक्षम पर्याय उभा आहे. त्याला साथ द्या, असे आवाहन जय मल्हार मालिकेतील अभिनेता देवदत्त नागे यांनी भंडाराची उधळण करत केले.

ABOUT THE AUTHOR

...view details