महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जुन्नरचे नाव 'शिवनेरी' करावे, 'या' आमदाराने केली मागणी

जुन्नरचे नाव बदलून शिवनेरी असे करावे, अशी मागणी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी केली. त्यांनी आज विधानसभेत ही मागणी केली.

Shivneri
जुन्नरचे नाव 'शिवनेरी' करावे

By

Published : Dec 19, 2019, 11:21 PM IST

Updated : Dec 19, 2019, 11:32 PM IST

पुणे -जुन्नरचे नाव बदलून शिवनेरी असे करावे, अशी मागणी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी केली. त्यांनी आज विधानसभेत ही मागणी केली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवनेरीवर आल्यानंतरही त्यांनी बेनके यांनी त्यांच्याकडे ही मागणी केली होती.

शिवनेरी ही छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी आहे. शिवनेरी हे ठिकाण जुन्नरपासून जवळच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अढळ स्थान आहे. त्यामुळे जुन्नरचे नाव शिवनेरी करावे अशी मागणी बेनके यांनी केली.

वन-अधिकारी म्हणतात, बिबट्याशी मैत्री करा...

जुन्नरमध्ये ManVsWild सुरू आहे. जुन्नर परिसरामध्ये वनविभागाच्या मते २५० बिबटे आहेत. मात्र, प्रत्यक्षात आकडा त्यापेक्षाही मोठा आहे. वनविभागाचे अधिकारी म्हणतात बिबट्याशी मैत्री करा. बिबट्यांचा बंदोबस्त केला नाही तर आमच्या पिढ्या उरणार नाहीत, असे मतही अतुल बेनके यांनी सभागृाह मांडले. तसेच लवकरात लवकर परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली.

Last Updated : Dec 19, 2019, 11:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details