पुणे :दिवाळीसाठी सगळीकडे जोरदार तयारी सुरू ( preparation for Diwali) आहे. दिवाळीमध्ये आकाश कंदीलांचा व्यवसाय हा फार मोठा असतो. गेल्या दोन वर्षापासून जे लोक हंगामी व्यवसायात आकाश कंदील विकण्याचा आनंद घेतात. त्यांना आनंद घेता आला नाही. त्यामुळे गेल्यावर्षी तरी काही व्यवसाय झाला नाही परंतू यावर्षी चांगला प्रतिसाद आहे आणि वेगवेगळे आकाश कंदील ( Diwali lanterns ) बाजारामध्ये आता आले आहेत. ग्राहक सुद्धा अतिशय उत्सुकतेने दिवाळी साजरी करण्यासाठी आकाश कंदील खरेदी करत असल्याचे दिसत आहेत.
Diwali Lanterns : दिवाळीसाठी आकर्षक आकाश कंदील बाजारात, ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद - Diwali lanterns
दिवाळीसाठी सगळीकडे जोरदार तयारी सुरू ( preparation for Diwali) आहे. दिवाळीमध्ये आकाश कंदीलांचा व्यवसाय हा फार मोठा असतो. गेल्या दोन वर्षापासून जे लोक हंगामी व्यवसायात आकाश कंदील विकण्याचा आनंद घेतात. त्यांना आनंद घेता आला नाही. त्यामुळे गेल्यावर्षी तरी काही व्यवसाय झाला नाही परंतू यावर्षी चांगला प्रतिसाद आहे आणि वेगवेगळे आकाश कंदील ( Diwali lanterns ) बाजारामध्ये आता आले आहेत.
50 ते 60 टक्के कंदीलची विक्री : पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये आकाश कंदीलाचे स्टॉल लागलेले आहेत साधारण एफसी रोड असेल मंडळी असेल डेक्कन असेल या भागांमध्ये रात्रीच्या वेळेस आकर्षक अशी विद्युत रोषणाई ( attractive lighting ) दिसून येत आहे. आकाश कंदील खरेदीसाठी संध्याकाळीच प्रामुख्याने नागरिक सुद्धा येतात. कारण आकर्षक विद्युत रोषणाई आणि त्याचे डिझाईन आहे ते नागरिकांना अगदी स्पष्ट आणि दिसते. त्यामुळे व्यापारी सुद्धा यावेळी प्रचंड अशा ठेवून आहेत. आपल्याला यावर्षी सण चांगला करता येईल आणि आतापर्यंत 50 ते 60 टक्के विक्री झाल्याचे व्यापारी सांगत आहेत.