पिंपरी-चिंचवड (पुणे) - विनामुखपट्या फिरणाऱ्या तरुणावर कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची थेट कॉलर पकडल्याची घटना ताजी असताना चिंचवडमध्ये वाहतूक पोलिसाला किमान एक किलोमीटरपर्यंत मोटारीच्या बोनेटवर बसवून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
व्हिडिओ : 'त्या' वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मोटारीच्या बोनेटवर बसवून नेले एक किलोमीटर..! - चिंचवडमध्ये वाहतूक पोलिसावर गाडी घालण्याचा प्रयत्न
संबधित पोलीस कर्मचारी हे पेंडिंग पावत्या करत होते. तेव्हा एका मोटार चालकाला थांबविले. मोटारीच्या पुढे येऊन चालकाला खाली उतरण्यास सांगितले. मात्र, मोटार तशीच वेगात पुढे नेली. तेव्हा, वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला जीव वाचवण्यासाठी बोनेटवर चढावे लागले आणि...
संबधित पोलीस कर्मचारी हे पेंडिंग पावत्या करत होते. तेव्हा एका मोटार चालकाला थांबविले. मोटारीच्या पुढे येऊन चालकाला खाली उतरण्यास सांगितले. मात्र, मोटार तशीच वेगात पुढे नेली. तेव्हा, वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला जीव वाचवण्यासाठी बोनेटवर चढावे लागले. त्यानंतर जवळपास एक किलोमीटरपर्यंत मोटारीच्या बोनेटवर बसवून वाहनचालकाने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला नेले. हा सर्व थरार चिंचवड चौकात सायंकाळी घडला. आबासाहेब सावंत असे वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी युवराज किसन हनवते (वय 49 रा. पिंपळे निलख) यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जीव वाचवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याला बोनेटला धरून बसावे लागले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलीस कर्मचारी चिंचवडच्या एलप्रोजच्या चौकात मुखपट्या नसलेल्या आणि पेंडिंग पावत्या संदर्भात वाहतूक चालकांवर कारवाई करत होते. तेव्हा, वाहनचालक युवराज हा तिथून जात होता. त्यांना वाहतूक पोलीस आबासाहेब यांनी थांबवले. परंतु, ते मोटार पुढे-पुढे नेत होते. तेव्हा वाहतूक पोलीस कर्मचारी आबासाहेब हे मोटारीच्या पुढे येऊन थांबले. मात्र, आरोपी युवराज याने मोटार तशी वेगात पुढे नेली आणि जीव वाचवण्यासाठी आबासाहेब यांना बोनेटला धरून बसावे लागले. हा सर्व थरार चिंचवड येथे घडला असून एक किलोमीटरपर्यंत त्यांना घेऊन जाण्यात आले. सर्व नागरिक आणि वाहतूक पोलीस त्याला गाडी थांबवण्याची विनंती करत होते. परंतु, ते थांबण्यास तयार नव्हते अखेर नागरिकांचा दबाव आणि समोरील मोटारीला थांबवून त्यांची मोटार थांबवली. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.