पुणे-शहरात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने जोरदार तयारी केली असून शहरात अनेक ठिकाणी सेंटर उभारले आहे. नव्याने पॉझिटिव्ह सापडणाऱ्या रुग्णांना या सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे. परंतू यातील काही रुग्ण क्वारंटाईन सेंटरमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. सोमवारी सायंकाळी असाच एक प्रकार उघडकीस आला असून क्वारंटाईन सेंटरमधून पळून जाण्याचा प्रयत्न करणार्या एका १८ वर्षीय तरुणीसोबत असे काही घडले की नंतर अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले
पुण्याच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये खिडकीत अडकली तरुणी, वाचा नेमके काय घडले
कोरोना रुग्ण वाढू नयेत म्हणून प्रशासनाने क्वारंटाइन सेन्टरसारखी ठिकाणे तयार केली आहेत. मात्र, तिथूनही नागरिक पळून जात असल्याने प्रशासनासमोर नव्या समस्या उभ्या राहताना दिसत आहेत.
पळून जाण्याच्या प्रयत्नात ग्रीलमध्ये अडकली
शहरातील एरंडवणे भागातील एका क्वारंटाइन सेन्टरमधून रात्री साडे अकराच्या सुमारास एका युवतीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या मजल्यावरून खाली जाण्याचा तिचा विचार होता. त्यानुसार तिने खिडकीचा वापर करण्याचे ठरवले आणि झाले भलतेच. ही मुलगी खिडकीच्या गजांमध्ये अडकून बसली. कोणालाही प्रयत्न करूनही तिला बाहेर काढता येईना. अखेर अग्निशमन दलाला बोलवावे लागले. त्यांनी त्या मुलीला धीर देत खिडकीचे गज कापून तिची सुटका केली. यावेळी हायड्रलिक कटरचा वापर करावा लागला.
प्रशासनासमोर नव्या समस्या
कोरोना रुग्ण वाढू नयेत म्हणून प्रशासनाने क्वारंटाइन सेन्टरसारखी ठिकाणे तयार केली आहेत. मात्र, तिथूनही नागरिक पळून जात असल्याने प्रशासनासमोर नव्या समस्या उभ्या राहताना दिसत आहेत. ही युवती दुसऱ्या मजल्यावरून खाली जाताना जखमी झाली असती किंवा जीवावर बेतले असते तर गंभीर प्रसंग ओढवण्याची शक्यता होती.