महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चाकण; वाहतूक पोलिसावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद - pune crime news

चाकण औद्योगीक वसाहतीमधील चाकण चौकातून कंटेनरची मोठ्या संख्येने वाहतुक सुरु असते त्यामुळे या परिसरात दररोज वाहतुक कोंडी होते. वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यांच्यावर हल्ला होणे अतिशय गंभीर बाब आहे.

वाहतूक पोलिसावर जिवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद
वाहतूक पोलिसावर जिवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद

By

Published : Jan 31, 2021, 8:47 AM IST

Updated : Jan 31, 2021, 11:45 AM IST

पुणे (चाकण)- चाकण चौकात वाहतूक पोलीसावर दोन अज्ञात इसमांनी लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना घडली. रवींद्र करवंदे असे वाहतूक पोलिसाचे नाव असून उपचारासाठी त्यांना चाकण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ला झालेल्या दिवशीच एक कंटेनर चालक आणि रवींद्र यांच्यात वाहतूक कोंडीवरुन वाद झाला होता. याच वादामुळे रविंद्र यांच्यावर हल्ला झाला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे.

वाहतूक पोलिसावर जीवघेणा हल्ला

आरोपींना अटक
चाकण औद्योगीक वसाहतीमधील चाकण चौकातून कंटेनरची मोठ्या संख्येने वाहतुक सुरु असते त्यामुळे या परिसरात दररोज वाहतुक कोंडी होते. वाहतूक पोलीस वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यांच्यावर हल्ला होणे अतिशय गंभीर बाब आहे. या प्रकरणाची पिंपरी चिंचवड पोलिसांनी गंभीर दखल घेत हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना रात्री उशिरा ताब्यात घेतले असून रोहीत साळवी व हर्षदीप कांबळे अशी हल्ला करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. हे दोन्ही आरोपी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील रहिवासी आहेत.

Last Updated : Jan 31, 2021, 11:45 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details