पुणे- शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथे बँक अॅाफ इंडियाच्या एटीएमवर अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला आहे. गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन कापून लाखोंचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला. मात्र, यावेळी चोरट्यांनी आपली ओळख लपविण्यासाठी दरोडा टाकत असताना सीसीटीव्ही कॅमेराला कलर लावला होता. या प्रकरणाचा पुढील तपास रांजणगाव पोलिसांकडून केला जात आहे.
रांजणगाव येथील बँक अॉफ इंडीयाच्या एटीएमवर अज्ञात चोरट्यांचा दरोडा.. - सीसीटिव्ही कँमेराला कलर लावला
शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथे बँक अॅाफ इंडीयाच्या एटीएमवर अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला आहे. गॅस कटरच्या सहायाने एटीएम मशीन कापून लाखोंचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला आहे.
लोकांना पैसे काढणे सोयीस्कर व्हावे यासाठी बँकेकडून एटीएम मशीन उपलब्ध करुन देण्यात आले. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून या एटीएम मशीनांना चोरट्यांकडून लक्ष केले जात आहे. त्यामुळे एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असूनही बँकांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र, याच अपुऱ्या सुरक्षेचा फायदा घेत चोरट्यांनी रांजणगाव येथील बँक अॅाफ इंडियाच्या एटीएमवर दरोडा टाकला आहे.
रांजणगाव येथील बँक अॉफ इंडियाच्या एटीएमवर अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून गँस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन कापून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. एकूण किती रक्कम चोरीला गेली, हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, बँक अधिकारी चोरीला गेलेल्या एकून रकमेचा हिशोब लावून याबाबत सकाळी रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार आहेत.