पुणे - चोरांनी चोरीच्या बहाण्याने एटीएम मशीनचा स्फोट घडवून आणल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मध्यरात्री ३वाजेच्या सुमारास जिल्ह्याच्या चाकण औद्योगिक वसाहत परिसरातील भांबोली फाटा येथे घडली.
पुणे : चोरीच्या बहाण्याने एटीएमचा स्फोट; तपास सुरू - पुणे चाकण औद्योगिक वसाहत चोरी घटना
चोरट्यांनी हिताची कंपनीच्या एटीएम मशीनमध्ये स्फोट केला. नंतर एटीएम मशिन फोडली. स्फोटात एटीएम मशिनचा अर्धा भाग फुटला आहे. तर काचाही चक्काचूर झाला आहे.

चोरीच्या बहाण्याने एटीएमचा स्फोट
घटनास्थळाची दृश्ये
चोरट्यांनी हिताची कंपनीच्या एटीएम मशीनमध्ये स्फोट केला. नंतर एटीएम मशिन फोडली. स्फोटात एटीएम मशिनचा अर्धा भाग फुटला आहे. तर काचाही चक्काचूर झाला आहे. स्फोटात एटीएम मशिनमधील काही रक्कमही बाहेर फेकली गेली आहे. तर काही रक्कम ही न फुटलेल्या भागात सुरक्षित राहिली आहे. मात्र, यात एकूण किती रक्कम चोरीला गेली हे अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
Last Updated : Jul 21, 2021, 12:19 PM IST