पुणे: दीपक कांबळे या व्यक्तीने शनिवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृतदेहावर सायंकाळी कैलास स्मशानभूमीत अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी (during a funeral process) त्याचे बरेच नातेवाईक, तसेच संबंधित असे सुमारे चारशे लोक यावेळी जमले होते. मृतदेहाला अग्नी देत असताना चितेवर डिझेल टाकण्यात येत असताना अचानक भडका उडाला (explode during a funeral ) आणि जवळपास थांबलेले 11 जन त्यात होरपळून निघाले.
explode during a funeral : पुण्यात अंत्य संस्काराच्यावेळी कॅनचा स्फोट होऊन 11 जण जखमी - 11 जण जखमी
मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू असताना (during a funeral process) अचानक भडका उडाल्याने (explode during a funeral ) अकरा जण भाजल्याची ( injuring 11 people) धक्कादायकघटना पुण्यातील कैलास स्मशानभूमीत सायंकाळी घडली. जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

अंत्यसंस्कार
होरपळलेल्या व्यक्तीमध्ये आशा प्रकाश कांबळे (59), येणाबाई बाबू गाडे (50), नीलेश विनोद कांबळे (35), शिवाजी बाबूराव सूर्यवंशी (55), वसंत बंडू कांबळे (74), दिगंबर श्रीरंग पुजारी (40), हरीश विठ्ठल शिंदे (40), आकाश अशोक कांबळे, शशिकांत कचरू कांबळे (36), अनिल बसन्ना शिंदे (53), अनिल नरसिंग घटवळ यांचा समावेश आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्वजण 30 ते 35 टक्के भाजले आहेत. घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक हरीश ठाकूर करीत आहेत.