पुणे - जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बीण प्रकल्प असलेल्या जुन्नरच्या खोडद येथील जीएमआरटीच्या मदतीने पुण्यातील एनसीआरएच्या शास्त्रज्ञानी दुर्मिळ मृत आकाशगंगेचा शोध लावला आहे. या आकाशगंगेच्या अवशेषांमधून रेडिओ लहरींचे उत्सर्जन होत आहे. या संदर्भातले संशोधन राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकशास्त्र केंद्राच्या(एनसीआरए) डॉ.सी.एच ईश्वरचंद्रा आणि आफ्रिकेतील डॉ. झारा आर यांनी केले आहे. ते नुकतेच प्रकाशित झालेल्या 'आर्काईव्ह' या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे. 'जे 1615+5452' असं या आकाशगंगेचं नाव आहे.
पुण्यातील शास्त्रज्ञांनी लावला मृत आकाशगंगेचा शोध; अंतराळ संशोधनातील मोठी घटना - जायंट मिटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप
जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बीण प्रकल्प असलेल्या जुन्नरच्या खोडद येथील जीएमआरटीच्या मदतीने पुण्यातील एनसीआरएच्या शास्त्रज्ञानी दुर्मिळ मृत आकाशगंगेचा शोध लावला आहे. या आकाशगंगेच्या अवशेषांमधून रेडिओ लहरींचे उत्सर्जन होत आहे.
जुन्नरच्या खोडद येथील जीएमआरटीच्या मदतीने पुण्यातील एनसीआरएच्या शास्त्रज्ञानी दुर्मिळ मृत आकाशगंगेचा शोध लावला आहे.
या आकाशगंगेचा विस्तार 3 लाख प्रकाशवर्षं इतका असून तिचे वय 7.6 कोटी वर्ष आहे. 150 ते 1400 मेगाहर्ट्झ लहरींचे उत्सर्जन तिच्यातून होत असल्याचे नोंदवण्यात आले आहे. सुमारे 30 टक्के भाग अजून नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे या परीक्षणात समोर आले आहे.
Last Updated : Jun 30, 2020, 7:11 PM IST