पुणे :भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे ( Bharti vidyapith Police Station ) सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज आनंद पाटील (Assistant Police Inspector Suraj Anand Patil ) याने तक्रारदाराकडे 2 लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न ( bribe of Rs 2 lakh was demanded ) झाल्यानंतर त्यांच्यावर पुणे एसीबीने गुन्हा दाखल केला ( Pune ACB registered a case ) होता. पोलीस प्रशासनाकडून स्वराज आनंद पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.
भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने केला गुन्हा दाखल: स्वराज आनंद पाटील हे पूर्वी कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत होते. त्यावेळी त्यांच्याविरोधात ही तक्रार आली होती. त्यानंतर त्यांची बदली भारती पोलीस स्टेशनला झाली. चौकशीनंतर त्यांना पुणे पोलिसांकडून निलंबित करण्यात आल्याचे आदेश काढण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार जागा आणि प्लॉटच्या वादा संदर्भात पत्नीने आणि सासऱ्याने केलेल्या अर्जावर कारवाई न करण्यासाठी 2 लाख रुपये लाचेची मागणी करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षकावर पुणे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता
लाच देणे मान्य नसल्याने एसीबीकडे तक्रार केली : स्वराज आनंद पाटील असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांची नाव आहे. पुणे एसीबी कडून कोंढवा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत हा गुन्हा दाखल केला गेला होता. याबाबत 34 वर्षाच्या व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांची पत्नी व सासरे यांच्या जागा प्लॉटचा वाद आहे. या वादासंदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज करण्यात आला होता. तक्रार अर्जावरून कारवाई न करण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज पाटील यांनी दोन लाख रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबी कडे तक्रार केली होती.
निलंबनची कारवाई करण्यात आली : पुणे एसीबीच्या पथकाने 25 मे 2022 आणि 2 जून 2022 ला पडताळणी केली. पडताळणी दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे कारवाई न करण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी दोन लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले पुणे एसीबीने गुरुवारी 24 नोव्हेंबरला कोंढवा पोलीस ठाण्यात स्वराज पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. 6 डिसेंबरला त्यांच्यावर निलंबन ची कारवाई करण्यात आली आहे.