बारामती (पुणे) - इंदापूर तालुक्यातील बावडा येथे आज (दि. 22 नोव्हेंबर) सकाळी नऊच्या सुमारास एका युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. शाहरूख बशीर शेख (वय 21 वर्षे, रा. बावडा, ता. इंदापूर) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावर इंदापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच जखमी युवकाने इंदापूर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. याप्रकरणी बापू निकम (रा. बावडा, ता. इंदापूर, जि. पूणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदापूर येथे तरुणावर प्राणघातक हल्ला - indapur crime news
इंदापूर तालुक्याती बावडा येथे एका युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी जखमी युवकाने दिलेल्या तक्रारीवरुन एका युवकाविरोधात इंदापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बावडा येथील महाराष्ट्र बँक चौकात वडापावच्या गाड्या शेजारी तक्रारदार बसला असता आरोपी निकम हा दुचाकीवरून हातात चाकू घेऊन शाहरुख जवळ गेला. माझा भाऊ रणजीत निकम यास तू बोललास का? असे म्हणत हातातील चाकूने शाहरुखच्या मानेवर, हातावर, पोटावर, डोक्यावर वार करून गाडी घेऊन पळून गेला. यात शाहरुख गंभीर जखमी होऊन खाली पडला असताना शाहरुखचा भाऊ आलम त्याचा मित्र अल्ताफ सय्यद यांनी जखमी त्याला मोटरसायकलवरून इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत पुढील तपास इंदापूर पोलीस करीत आहे.