पुणे :पुण्याच्या तळेगावमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक किशोर आवारे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्यांची घटना आज दुपारी तळेगावर नगरपरिषद कार्यालयासमोर घडली आहे. या हल्ल्यात किशोर आवारे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेमुळे पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात हल्लेखोरांचा शोध पिंपरी चिंचवड पोलिस घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोमाटणे टोलनाका टोलमुक्त व्हावा यासाठी किशोर आवारे हे सोमटाने टोलनाका हटाव कृती समितीच्या माध्यमातून ते लढा देत होते. ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Attack On Kishor Aware : किशोर आवारे यांच्यावर प्राणघातक हल्ला - तळेगावर नगरपरिषद कार्यालय
जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक किशोर आवारे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. आवारे यांच्यावर तळेगावर नगरपरिषद कार्यालयासमोर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. या हल्ल्यात किशोर आवारे गंभीर जखमी झाले असुन त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तळेगाव दाभाडे परिसरात खळबळ :आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात कामानिमित्त आले होते. त्यावेळी दबा धरुन धरलेल्या अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेमुळे तळेगाव दाभाडे परिसरात खळबळ उडाली असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुण्याच्या तळेगावमध्ये नगर परिषदेच्या समोरच किशोर आवारे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या मग कोयत्याने वार करण्यात आले अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आवारे हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून सध्या त्यांनी राजकीय क्षेत्रात पाऊल टाकले होते.
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न :काही दिवसांपूर्वी जुना पुणे- मुंबई महामार्गावरील टोल नाका नागरिकांसाठी टोलमुक्त व्हावा यासाठी ते प्रयत्न करत होते. नागरिकांना एकत्र करून टोलच्या विरोधात त्यांनी आंदोलन छेडले होते. या त्यांच्या लढ्याला काहीसे यश देखील आले होते. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून भर दिवसा जीवघेणा हल्ला झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.
- Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे व नाना पटोले यांच्या राजीनाम्यातून सगळ्यांना धडा मिळाला-अजित पवार
- Sharad Pawar for MVA stronger : महाविकास आघाडी मजबुतीची शरद पवारांची हाक, अजित पवारांच्या उपद्रवमूल्यावर प्रश्नचिन्ह
- CBSE Class 10 Results : सीबीएससी 10 वीचा निकाल जाहीर, जाणून घ्या कसा पहायचा दहावीचा निकाल