महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घरभाडे मागितले म्हणून घर मालकाला चौथ्या मजल्यावरून ढकलले - सौरभ पोरे

सौरभ पोरे असे जखमी तरुणाचे नाव असून तो आणि त्याचे वडील आठ महिन्याचे थकलेले घरभाडे मागण्यासाठी गेले होते. तेव्हा भाडेकरू कुटुंबाने त्यांना टेरेसवर बोलवून भाडे मागण्याच्या कारणावरून धक्कामुक्की केली. यातच सौरभला चौथ्या मजल्याच्या टेरेसवरून ढकलून देण्यात आले असे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

घरमालकाला ढकलले
घरमालकाला ढकलले

By

Published : Sep 5, 2021, 8:34 PM IST

पिंपरी-चिंचवड - पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथे घरभाडे मागण्यासाठी गेलेल्या तरुणाला चौथ्या मजल्यावरून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी भाडेकरू कुटुंबावर सांगवी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ पोरे असे जखमी तरुणाचे नाव असून तो आणि त्याचे वडील आठ महिन्याचे थकलेले घरभाडे मागण्यासाठी गेले होते. तेव्हा भाडेकरू कुटुंबाने त्यांना टेरेसवर बोलवून भाडे मागण्याच्या कारणावरून धक्कामुक्की केली. यातच सौरभला चौथ्या मजल्याच्या टेरेसवरून ढकलून देण्यात आले असे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

विजय पाटोळे, त्याची पत्नी, मुलगी आणि साहिल विजय पाटोळे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत सचिन शिवदास पोरे (वय 50, रा. सुदर्शननगर, पिंपळे गुरव) यांनी गुरुवारी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार यांचा मुलगा सौरभ या घटनेत जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुटुंब तक्रारदारांच्या इमारतीमध्ये भाड्याने राहत आहे. मागील आठ महिन्यांचे घरभाडे थकले असल्याने ते मागण्यासाठी तक्रारदार आणि त्यांचा मुलगा सौरभ गेले होते. पैसे मागितल्याचा राग आल्याने आरोपी कुटुंबाने तक्रारदार आणि त्यांच्या मुलाला घराच्या टेरेसवर बोलावले. टेरेसवर शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून आरोपींनी सौरभला चौथ्या मजल्यावरून खाली ढकलून दिले. यामध्ये सौरभ गंभीर जखमी झाला आहे. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details