पुणे : महाराष्ट्रातील संतांची आळंदी ते पंढरपूर वारी विविध अंगी विविध दर्शन दाखवणारी असते. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातील संस्कृती आणि संस्कार दाखवणाऱ्या या वारीमध्ये आता महिला सुद्धा पाठीमागे राहिल्या नाही. यामध्ये महिला मुली सुद्धा खूप मोठे काम करत असल्याचे दिसत आहे. संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचा अवघड असा दिवेघाटचा प्रवास आज पूर्ण झाला. पालखी सासवड येथे मुक्कामी थांबली आहे. याच वारीमध्ये एक मेडिकलची विद्यार्थिनी सहभागी झाली असून ती स्वतः एक कीर्तनकार आहे, तर तिची छोटी बहीण उत्कृष्ट पखवाज वादक आहे.
चार वर्षापासून अखंड वारी :अवघड दिवे घाटामध्ये खांद्यावर उभा टाकून तिच्या छोट्या बहिणीने उत्कृष्ट पखवाज वादन केले आहे. त्याची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. सोलापूर जिल्ह्याजवळील सांगोला मधल्या वारीमध्ये या दोघी बहिणी दरवर्षी चालत असतात. गेल्या चार वर्षापासून अखंड वारी करत एक बहिण कीर्तनकार तर दुसरी बहीण उत्कृष्ट पखवाज वादक बनली आहे. आनंद जगात कुठेच नाही आणि तो मिळणारही नाही, त्यामुळेच आम्ही या वारीत सहभागी होत असल्याचे त्या बहिणींनी सांगितलेले आहे.
फार्मसी मेडिकल स्टुडन्ट : सुप्रिया बीरा बंडगर ही मोठी बहीण आहे. ती स्वतः एक फार्मासिस्ट आहे. ती म्हणाली, मी गेली तीन ते चार वर्षे झाली पायी वारी करते. खरंतर मी लहान असताना बऱ्याच कीर्तनकारांकडून ऐकायचे, जीवनामध्ये माणसाने एकदा तरी पंढरीची वारी केली पाहिजे. साक्षात अनुभव घेताना कळते की, पंढरीची वारी म्हणजे नेमके काय आहे? जो आनंद आपण कुठल्याही बाजारात पैसे देऊन विकत घेऊ शकत नाही. तो आनंदाने समाधान या पंढरीच्या वारीमध्ये मिळते. मी एक फार्मसी मेडिकल स्टुडन्ट आहे. मी मेडिकलमध्ये असताना सुद्धा, की एक महिन्याची सुट्टी काढून येते. मी घरातल्या कार्यक्रमालाही सुट्टी काढत नाही. पण या पंढरीच्या वारीसाठी 21 दिवसाची सुट्टी काढून वारीसाठी आलेली आहे. याच्यापेक्षा दुसरा आनंद म्हणजे, की माझी आई, वडील, माझे बहीण, भाऊ या सगळ्यांसोबत मला ही वारी करायला मिळते. याच्यापेक्षा आनंद आणि याच्यापेक्षा श्रीमंती मी दुसरी कोणती समजू शकत नाही.
पखवाज वाजवण्याचा आनंद :लहान बहिण साक्षी बिरा बंडगर सांगोला म्हणाली, मी गेले दोन, तीन वर्षापासून वारी करते. असे ऐकले होते की, साक्षात आपण वारी गेल्यानंतर खूप आनंद असतो. मी दहावीमध्ये आहे. माझे तास सुरू असताना देखील मी एकवीस दिवस सुट्टी काढून वारीत सहभागी झाली आहे. माझ्या वडिलांमुळे मी वारीत सहभागी झाले. पखवाज वाजनाचे शिक्षण गेल्या दोन वर्षांमध्ये झाले. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे गुरुवर्य उमेश महाराज ठाकरे हे आमच्या घरी राहणार होते. एकादशी ते सराव करत होते, मीही त्यांच्या जवळ जाऊन बसले. त्यांना सांगितले मलाही पखवाज शिकायचे आहे. एकच महिन्यामध्ये मी पखवाज शिकला आहे. आज मी उमेश महाराज ठाकरे आणि भोजलिंग महाराज यांच्यामुळे प्रत्येक ठिकाणी कीर्तनात पखवाज वाजवत आहे. वारीमध्ये सुद्धा पखवाज वाजवण्याचा आनंद घेत आहे.
हेही वाचा :
- Aashadhi Wari 2023 : दिवे घाटात घुमला विठुमाऊलीचा गजर; पहा ड्रोन व्हिडिओ
- Ashadhi Wari 2023 : के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीकडून दिवेघाटात बॅनरबाजी; पक्ष वाढविण्याकरिता प्रयत्न
- Ashadhi Wari 2023 : संत तुकाराम, ज्ञानोबाची शिकवण रुजवण्यासाठी वारकऱ्यांची सेवा करतात मुस्लिम बांधव