पुणे - केंद्र सरकारने जिवनावश्यक खाद्यान्न वस्तूवर 5 टक्के जीएसटी लागू केला आहे. (GST from central government on goods Applicable) यापूर्वी व्हॅटमध्ये देखील या सर्व वस्तू करमुक्त होत्या. त्यामुळे जीएसटी मधूनही या वस्तू करमुक्त ठेवण्याचे ठरले होते. असे असताना शासनाने सुरुवातीला फक्त रजिस्टर ब्रॅन्डमध्ये विक्री होणाऱ्या जिवनावश्यक खाद्य वस्तूंवर जीएसटीची आकारणी केली होती. या ब्रॅन्डमधील वस्तू समाजातील सधन वर्ग वापरतात त्यामुळे सर्वसामान्य जनतेवर त्याचा बोजा पडणार नाही, असे सांगितले गेले होते. नवीन बदल करताना या कायद्यात ब्रॅन्डेड ऐवजी प्रि पॅक्ड आणि प्रि लेबल्ड असा शब्दांचा बदल करण्याचे प्रस्तावीत आहे. पण या बदलामुळे एकूणच सर्व वस्तू अन्नधान्य व डाळी कडधान्ये, आटा, रवा, मैदा, दुग्धजन्य पदार्थ इ. जिवनावश्यक वस्तूंना जीएसटी लागू होईल. याचाच निषेध म्हणून आज देशभरातील भुसार व्यापाऱ्यांनी एक दिवस दुकाने बंद ठेवली आहेत. केंद्र सरकारच्या अन्न धान्य व खाद्य वस्तूंवरील लावण्यात आलेल्या 5 टक्के जीएसटीच्या निषेधार्थ पुणे येथील मार्केट यार्डातील तब्बल 600 भुसार व्यापाऱ्यांचे दुकाने आज दिवसभर बंद असणार आहे. केंद्र सरकार जर निर्णय मागे नाही घेतला तर तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी व्यापाऱ्यांनी दिला आहे.
Market Yard Pune : जीएसटीच्या निषेधार्थ व्यापारी आक्रमक; देशभरातील भुसार मार्केट बंद - GST from central government on goods Applicable
अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर केंद्र शासनाकडून ५% जी.एस.टी. (GST from central government on goods Applicable) लागू होणार असल्याच्या निषेधार्थ आज पुण्यातील (Bhusar Traders At Market Yard In Pune) व्यापाऱ्यांकडून मार्केट यार्ड येथील भुसार मार्केट एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आले आहेत. तर पुण्यातील मार्केट यार्ड (Market Yard Pune) येथील तब्बल 600 भुसार व्यापाऱ्यांचे दुकाने आज दिवसभर बंद असणार आहेत.
करोना काळात नोकऱ्यांच्या संधी कमी झाल्या आहेत. अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. अशा वेळेस एकूण ग्राहकांची खर्च करण्याची क्षमता कमी झाली आहे. पर्यायाने ग्राहक जीएसटीचा भार सहन करत नाहीत. शेतकऱ्यास त्यांच्या उत्पादनाच्या किंमतीमधून सदर जीएसटी कमी केल्यामुळे कमी पैसे मिळतील. तसेच ग्राहकांकडून जीएसटी वसूल केल्यामुळे ग्राहकांवर त्याचा बोजा पडेल. सर्वच वस्तूंच्या किंमतीत वाढ होईल. सदर अन्नधान्य व जिवनावश्यक वस्तूंचा व्यापार छोटे छोटे किराणा दुकानदार करतात. सदर वस्तूंना जीएसटी लागल्यामुळे त्यांनाही जीएसटी भरणे क्रमप्राप्त होईल. याबाबत कायदेशीर पूर्तता करणे तसेच त्यासाठी लागणारा कर्मचारी नेमणे शक्य नाही. अशा परिस्थितीत त्यांना व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. जर पारंपारिक व्यवसाय बंद केले तर त्यावर अवलंबून असलेले कोट्यावधी लोक बेरोजगार होतील.असे देखील यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितल.
हेही वाचा :Pune GST fraud : जीएसटीने पुण्यातील व्यापार्याला केली अटक, 13 कोटींचा घोटाळा उघड
TAGGED:
Market Yard Pune