पुणे - राज्यातल्या विविध विद्यापीठातल्या तिसऱ्या वर्षाच्या परीक्षांवरील संभ्रम अखेर शुक्रवारी संपला. सर्वोच्च न्यायालयाने तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा घ्या, असे राज्य सरकारांना स्पष्ट केले आहे. त्यामुळे या परीक्षा लवकरच घेण्यात येतील. या परीक्षा ही सांघिक जबाबदारी आहे. ही केवळ विद्यार्थ्यांची परीक्षा नसून शिक्षक, कर्मचारी, महाविद्यालये या सर्वांचीच ही परीक्षा असणार आहे. त्यामुळे सांघिक जबाबदारीने या परीक्षा घ्याव्या, असे मत माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांनी ईटीव्हीशी बोलताना व्यक्त केले.
'पेपर हाताळल्याने संसर्ग पसरण्याची भीती; अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा घ्याव्या' - अंतिम वर्षाच्या परीक्षा
परीक्षा घेताना विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार केला जाणे महत्त्वाचे आहे. आता परीक्षा घेताना लेखी परीक्षा कशी घ्यायची, याचा विचार करावा लागणार आहे. लेखी परीक्षेसाठी पेपर योग्यरित्या हाताळणे ही बाब फार महत्वाची आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षासाठी तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा तोंडी पद्धतीने घ्याव्या, अशी सूचना ही त्यांनी यावेळी केली आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर विविध वर्गांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत घोळ उभा राहिला. राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेता पदवी देण्याची भूमिका घेतली. त्याला विरोधीपक्षांनी विरोध केला. या विद्यार्थ्यांवर कोरोना बॅच असा शिक्का बसेल, असे विरोधी पक्षाकडून सांगण्यात आले. दरम्यान राज्य सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असताना पुण्यातील माजी सिनेट सदस्य असलेल्या धनंजय कुलकर्णी यांनी न्यायालयात याविरोधात याचिका दाखल केली. परीक्षा न घेता पदवी देऊ नये, असे त्यांचे म्हणणे होते. तिसऱ्या वर्षाच्या परीक्षांसदर्भातील सर्व याचिकांवर निर्णय देतांना परीक्षा न घेता पदवी देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. याबाबत माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांनी ईटीव्हीशी बोलताना मत मांडले.