हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यापी पुणे :गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने राज्यातील अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला आहे. उन्हाळ्यात देखील पावसाळ्याचा अनुभव राज्यातील अनेक ठिकाणी पाहायला मिळाला आहे. यंदाचा पावसाळा हा कधी येणार येणार आहे? किती टक्के यंदा पाऊस पडणार? याबाबत अनेक अंदाज व्यक्त केले जात आहे.
हवामान विभागाच्या वतीने भारतात मान्सून 4 जून रोजी दाखल होणार आहे. भारतामध्ये यंदा 96 टक्के पाऊस पडण्याची शक्यता - डॉ अनुपम कश्यापी, पुणे हवामान विभागाचे प्रमुख
४ जून रोजी मॉन्सून दाखल :यंदाच्या मान्सून बाबत हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यापी म्हणाले की, यंदा केरळ मध्ये ४ जून रोजी मॉन्सून हे दाखल होऊ शकतो. पुढील २ दिवसात म्हणजेच ६ जून रोजी महाराष्ट्र मॉन्सून हजेरी लावेल असा पूर्व अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. दरवेळेस 1 जून रोजी मॉन्सून केरळमध्ये दाखल होत असतो. मात्र, यंदा पाऊस २ ते ३ दिवस लांबण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे भारतात यंदा ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून मॉन्सूनच्या दुसऱ्या सत्रात भारतात एल निनोचा प्रभाव देखील पाहायला मिळू शकतो, असे यावेळी त्यांनी सांगितले.
यावर्षी सरासरी पाऊस :गेल्या आठवड्यात, भारतीय हवामान खात्याने (IMD) या वर्षी सामान्य म्हणजेच ९६ टक्के पावसाचा अंदाज जाहीर केला. हा अंदाज 5 टक्क्यांनी कमी किंवा जास्त बदलू शकतो. 96 ते 104 टक्के सरासरी पाऊस आहे. 110 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस हा अतिवृष्टी मानला जातो. ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडल्यास तो दुष्काळ समजला जातो. यावर्षी भारतात सर्वसाधारण पाऊस अपेक्षित आहे. ही बाब शेतीबरोबरच अर्थव्यवस्थेसाठीही समाधानाची आहे.
हेही वाचा -
- Nitin Gadkari Threat Call : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी
- Trimbakeshwar Temple Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेला प्रकार गंभीर ; देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
- Pradeep Kurulkar Judicial Custody : प्रदीप कुरुलकर यांना 29 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी; येरवडा कारागृहात होणार रवानगी