पुणे - जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये साधना या सखी मतदान केंद्राची स्थापना करण्यात आले आहे. याठिकाणी लहान मुलांसाठी आकर्षक पाळण्यांची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे लहान मुलांच्या आई असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यास मदत होत आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघ : मतदान केंद्रावर लहान बाळांसाठी आकर्षक पाळण्यांची सोय - पुणे
पुणे जिल्ह्यात आज शिरुर लोकसभा मतदारसंघ आणि मावळ लोकसभा मतदारसंघ या २ मतदारसंघात मतदान सुरू आहे. दोन्ही मतदारसंघात अधिक मतदान होण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपक्रम राबवत आहेत. त्याद्वारेच या दोन्ही मतदारसंघात सखी मतदान केंद्र सुरू करण्यात आले आहे.
मतदान केंद्रावर पाळण्याची सोय
पुणे जिल्ह्यात आज शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि मावळ लोकसभा मतदारसंघ या २ मतदारसंघात मतदान सुरू आहे. दोन्ही मतदारसंघात अधिक मतदान होण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपक्रम राबवत आहेत. त्याद्वारेच या दोन्ही मतदारसंघात सखी मतदान केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यापैकी हडपसर भागातील साधना मतदान केंद्रात पाळणे ठेवले आहेत. त्यांना आकर्षकरित्या सजवले देखील आहे.