पुणे - सध्या सगळीकडे कोरोनाचे सावट असून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी एका ठिकाणी गर्दी करू नये असे आवाहन शासनाच्या वतीने केले जात आहे. असे असताना मात्र, दिल्ली येथील तबलीगी जमातच्या कार्यक्रमाला पुण्यातील १२६ लोक हजर झाल्याची माहिती पुणे महापालिकेकडून मिळाली आहे.
तबलीगी जमातच्या दिल्लीतील कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील १२६ लोक सहभागी झाल्याचे निष्पन्न - कोरोना अपडेट्स
दिल्ली येथे पार पडलेल्या तबलीगी जमातच्या कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील १२६ लोक सहभागी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये पुणे व कॅन्टोमेंट मधील ९२ तर, पिंपरी चिंचवड मधील ३४ नागरिक आहेत. पोलिसांनी आत्तापर्यंत सहभागी झालेल्या ३० ते ३५ जणांना शोधून काढलं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिल्ली येथे पार पडलेल्या तबलीगी जमातच्या कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील १२६ लोक सहभागी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये पुणे व कॅन्टोमेंट मधील ९२ तर, पिंपरी चिंचवड मधील ३४ नागरिक आहेत. पोलिसांनी आत्तापर्यंत सहभागी झालेल्या ३० ते ३५ जणांना शोधून काढलं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्हा आणि पुणे शहरातील नागरिकांचा समावेश आहे. या नागरिकांमध्ये सध्या तरी कोरोना संदर्भातील कुठलीही लक्षणे नाहीत, अशी माहिती पुणे महापालिका आरोग्य विभाग प्रमुख हंकारे यांनी दिली.
दिल्लीतील या कार्यक्रमासाठी देश विदेशातील नागरिक सहभागी झाले होते. पोलिसांनी देखील पुण्यातील नागरिक सहभागी झालेल्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यातील१२६ नागरिकांची यादी पोलिसांना मिळाली होती. त्यातील काही जणांची माहिती पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून शोधून काढली आहे. तर इतर लोकांचा पोलीस शोध घेत आहेत.