बारामती (पुणे) - तालुक्यातील मुदत संपलेल्या ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी आजपासून सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली असून पाच उमेदवारांनी दिवसअखेर आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विजय पाटील यांनी दिली.
बारामती तालुक्यात होऊ पाहणाऱ्या ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर केला जाणार आहे. यंदा निर्वाचीत सदस्यामधून सरपंचांची निवड होणार असल्याने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर केवळ सदस्यांचीच नावे असणार आहेत. जो सदस्य असेल त्यापैकीच एकाला सरपंच होता येणार आहे.
माळेगाव ग्रामपंचायत की नगरपंचायत?
माळेगाव ग्रामपंचायतीची निवडणूक नगरपंचायत म्हणून होणार का? याबाबत अद्याप कोणतेच निर्देश निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.
५२ ग्रामपंचायतींसाठी ५२२ सदस्य
बारामती तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी ५२२ सदस्य असणार आहेत. तर एकूण प्रभाग संख्या १८७, मतदान केंद्र संख्या २३०, एवढी असणार आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १ लाख ४२ हजार १५३ मतदार असून ६८ हजार २८४ स्त्री तर ७३ हजार ८६९ पुरुष आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
या ग्रामपंचायतींसाठी वाजले बिगुल
अंजनगाव, आंबीखुर्द, ब-हाणपूर, बाबुर्डी, चोपडज, ढाकाळे, ढेकळवाडी, देऊळगाव रसाळ, गोजूबावी, घाडगेवाडी, होळ, सदोबाचीवाडी, सस्तेवाडी, जळगाव सुपे, जोगवडी, जैनकवाडी, कटफळ, कारखेल, कांबळेश्वर, कोऱ्हाळे बुद्रूक, थोपटेवाडी, खंडोबाचीवाडी, खांडज, लाटे, माळेगाव खुर्द, माळवाडी (लाटे), माळवाडी (लोणी), मेखळी, मोढवे, नारोळी, निंबुत, निरावागज, पिंपळी, सावळ, सांगवी, शिरवली, शिरष्णे, सोनवडी सुपे, सोनगाव,तरडोली, उंडवडी सुपे, वढाणे, वडगाव निंबाळकर, वाकी, झारगडवाडी, माळेगाव बुद्रूक, पाहुणेवाडी, मळद, कन्हेरी, मुर्टी, मोराळवाडी, खराडेवाडी.
बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतींचे वाजले बिगुल, पाच उमेदवारांनी भरले अर्ज - बारामती तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक न्यूज
बारामती तालुक्यातील मुदत संपलेल्या ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी आजपासून सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली असून पाच उमेदवारांनी दिवसअखेर आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत.
बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतींचे वाजले बिगुल, पाच उमेदवारांनी भरले अर्ज
TAGGED:
gram panchayat election news