महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

APMC Election Result 2023 : भोर बाजार समितीवर काँग्रेसची सत्ता, आमदार संग्राम थोपटेंनी राखला गड - राष्ट्रवादी

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच बाजार समितीच्या निवडणुका पार पडत आहेत. या निवडणुकीत काँग्रेसने आपले वर्चस्व राखल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसने भोर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सगळ्या जागा जिंकल्या आहेत.

APMC Election Result 2023
विजयी उमेदवार

By

Published : Apr 29, 2023, 11:55 AM IST

पुणे :राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून अनेक जणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यातील सत्तांतरानंतर ही पहिली गाव पातळीवरील प्रत्यक्षात शेतकरी सहभागी असणारी निवडणूक होती. त्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याची चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये सुद्धा ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. मात्र या निवडणुकीमध्ये काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवली असून आमदार संग्राम थोपटेंनी आपला गड पुन्हा राखला आहे.

राजगड कृषी विकास पॅनलने जिंकल्या सगळ्या जागा :पुण्यातील भोर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला एक हाती विजय मिळवण्यात यश आले आहे. आमदार संग्राम थोपटे यांच्या राजगड कृषी विकास पॅनलने सर्वच 14 जागा जिंकून बाजार समितीवर सत्ता आणली आहे. यामध्ये विरोधक असणाऱ्या सर्वपक्षीय संघर्ष परिवर्तन पॅनलला एकही जागा मिळवता आलेली नाही. त्यांचा दारून पराभव झाला आहे. मात्र यापूर्वी झालेल्या निवडणुकीत चार जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.

राष्ट्रवादी शिवसेना भाजपला चारली धूळ :या निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा सहकारी मतदार संघात 897 पैकी 881 मतदान झाले. ग्राम पंचायत मतदार संघात 1106 पैकी 1084 इतके मतदान झाले. 2093 मतदारांपैकी 19 हजार 970 मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीत एकून 98 टक्के मतदान झाले आहे. भोर तालुक्यात आमदार संग्राम थोपटे यांचे पुन्हा एकदा वर्चस्व असल्याचे दिसले. त्यांच्या नेतृत्वाखाली पॅनलला 14 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी शिवसेना भाजप सर्वपक्षीय आघाडी अशी लढत झाली आहे. मात्र यात काँग्रेसचा विजय झाला आहे.

या उमेदवारांचा झाला विजय :कृषी सहकारी पतसंस्था सर्वसाधारण मधून आनंदराव आंबवले अंकुश खंडाळे राजाराम तुपे भाऊ मळेकर सुरेश राजवडे धनंजय वाडकर आणि निलेश सोनवणे हे विजयी झाले. पंचायत समिती मतदार संघातून महेश अशोक धाडवे, प्रवीण विष्णु शिंदे हे विजयी झाले आहेत. तर विविध कार्यकारी संस्था इतर मागास प्रवर्गातून ईश्वर पांगारे, भटक्या विमुक्त जाती जमातीतून विठ्ठल गोरे, ग्रामपंचायत दुर्बल घटक शहाजी बोरगे, कृषी सहकारी पतसंस्था महिला राखीव अनिता गावडे आणि सुरेखा कोंडे हे उमेदवार विजयी झालेले आहेत.

निवडणुकीत झाली अभद्र युती :विरोधकांनी अभद्र युती करून निवडणूक लढवली. या निवडणुकीत विरोधकांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला. मात्र बाजार समिती ताब्यात घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आघाडीला मतदाराने त्यांची जागा दाखवली. मात्र केलेल्या कामावर विश्वास ठेवून मतदारांनी सत्ता दिल्याची प्रतिक्रिया आमदार संग्राम थोपटे यांनी दिली आहे.

हेही वाचा - Wrestler Protest In Delhi : कुस्तीपटूंना न्याय मिळेल का, दिग्गज खेळाडूंचा सवाल, प्रियंका गांधीही आंदोलकांना भेटल्या

ABOUT THE AUTHOR

...view details