महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारामतीजवळीत तांदूळवाडी येथील युवकाला कोरोनाची बाधा - baramati corona

बारामतीत एका तरुणाला कोरोनाचा बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा तरुण काही दिवसांपूर्वी आईच्या अंत्यविधीसाठी पुण्याला गेला होता.

baramati
बारामतीजवळीत तांदूळवाडी येथील युवकाला कोरोनाची बाधा

By

Published : May 23, 2020, 2:52 PM IST

बारामती- शहरातील तांदूळवाडी येथील एका ३० वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


बाधित तरुण हा आईच्या अंत्यविधीसाठी पुण्याला गेला होता. २१ मे रोजी तो पुण्यावरून परतल्यानंतर त्याची येथील रुई शासकीय ग्रामीण रुग्णालयांमध्ये तपासणी करण्यात आली. तपासणीत सदर तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले.


तांदुळवाडीत सापडलेला या रुग्णासह शहर व तालुक्यातील रुग्णांची संख्या १४ झाली आहे. पैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जण बरे झाले असून चार जणांवर उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details