महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खडकी होळकर ब्रीजच्या खाली म्हसोबा मंदिराच्या आवारात अंधश्रद्धेच्या नावाखाली अघोरी प्रकार

खडकी येथील होळकर ब्रीजच्या खाली म्हसोबा मंदिराच्या आवारात झाडांना करणीच्या नावाने काळ्या बाहुल्या, फोटो, बिबे, लिंबू, साळींदर पक्ष्यांची काटे हे दांभण खिळ्यांच्या साह्याने झाडामध्ये ठोकण्यात येतात. हा अघोरी आणि अनिष्ट प्रकार या ठिकाणी दर अमावस्या-पौर्णिमेला चालत आहे. गेली चार वर्ष सातत्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याबाबत खडकी पोलिसांना माहिती देऊन त्या झाडामध्ये ठोकलेले खिळे बाहुल्या काढून ते जाळून टाकण्यात येत आहेत.

annis removes black dolls hanging from trees in khadki pune
खडकी होळकर ब्रीजच्या खाली म्हसोबा मंदिराच्या आवारात अंधश्रद्धेच्या नावाखाली अघोरी प्रकार

By

Published : Dec 13, 2020, 9:57 PM IST

पुणे -पुरोगामी महाराष्ट्रात सांस्कृतिक शहर ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील खडकी येथील होळकर ब्रीजच्या खाली म्हसोबा मंदिराच्या आवारात झाडांना करणीच्या नावाने काळ्या बाहुल्या, फोटो, बिबे, लिंबू, साळींदर पक्ष्यांची काटे हे दांभण खिळ्यांच्या साह्याने झाडामध्ये ठोकण्यात येतात. हा अघोरी आणि अनिष्ट प्रकार या ठिकाणी दर अमावस्या-पौर्णिमेला चालत आहे.

अंनिसच्या कार्यकर्त्यांतर्फे काढण्यात आल्या बाहुल्या
गेली चार वर्ष सातत्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याबाबत खडकी पोलिसांना माहिती देऊन त्या झाडामध्ये ठोकलेले खिळे बाहुल्या काढून ते जाळून टाकण्यात येत आहेत. आज ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांतर्फे या ठिकाणी जाऊन झाडाला लावण्यात आलेल्या बाहुल्या, फोटो, बिबे, खिळे काढून ते जाळण्यात आले.

नंदिनी जाधव बोलताना...
जादू टोणाविरोधी कायद्या अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवावा -
मागील 4 वर्षांपासून अंनिसच्या कार्यकर्ते खडकी पोलिसांना निवेदन देत आहेत. पण अद्यापही त्या ठिकाणी कोणत्याही अज्ञात व्यक्तीविरुद्ध "जादूटोणाविरोधी कायद्या" अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून घेण्यात आलेले नाही.
प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी -
गेली चार वर्ष दर अमावस्या-पौर्णिमेला मी याबाबत माहिती घेत असतो. परंतु तो प्रकार कमी होण्याऐवजी जास्त प्रमाणात वाढत चाललेला आहे. आज या ठिकाणी अशा अनिष्ट अघोरी प्रथा जर घडत असतील तर उद्या त्या ठिकाणी नरबळी सारखे प्रकार ही घडू शकतात. तरी या बाबत लवकरात लवकर कारवाई करणे गरजेचे आहे. या भागामध्ये फलक ही लावणे गरजेचे आहे. जर या ठिकाणी कोणी झाडाला करणीच्या नावाने जर कोणी खिळे ठोकताना दिसले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. परंतु अद्यापही त्या ठिकाणी कोणताही फलकही लावण्यात आलेला नाही. अजूनही या झाडांवर ती करणीच्या नावाने झाडाला इजा पोचली जात आहे. तरी याबाबत प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे जिल्हातर्फे करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details