पुणे - राज्याच्या माहिती अधिकार कायद्याप्रमाणे लोकायुक्त कायदाही देशासाठी आदर्श ठरेल, अशी अपेक्षा अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत आज लोकायुक्त कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी मसुदा समितीची बैठक पुण्याचा यशदामध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर ते बोलत होते.
राज्याचा लोकायुक्त कायदा देशासाठी आदर्शवत ठरेल - अण्णा हजारे - माहिती अधिकार
राज्याच्या माहिती अधिकार कायद्याप्रमाणे लोकायुक्त कायदाही देशासाठी आदर्श ठरेल, अशी अपेक्षा अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत आज लोकायुक्त कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी मसुदा समितीची बैठक पुण्याचा यशदामध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्य सरकार आणि अण्णा हजारे यांचे प्रत्येकी 5 सदस्य उपस्थित होते.
मसुदा समितीच्या बैठकीला राज्य सरकार आणि अण्णा हजारे यांचे प्रत्येकी 5 सदस्य उपस्थित होते. बैठकीनंतर अण्णा हजारे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, केंद्र सरकारने लोकपाल कायदा लागू केला आहे. त्याप्रमाणे प्रत्येक राज्यामध्ये लोकायुक्त कायदा मंजूर करणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्याच्या लोकायुक्त कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी पुण्यामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचा माहिती अधिकार कायदा देशासाठी आदर्शवत ठरला होता. असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना अण्णा हजारे म्हणाले, माहिती अधिकार कायद्याच्या धर्तीवर लोकायुक्त कायद्याचा मसुदा तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारपेक्षा राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचे सरकार चांगले काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.