पुणे -अण्णा हजारे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक हस्यास्पद व्यक्तिमत्त्व झाले आहे, अशी टीका राज्यसभेचे माजी खासदार अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली.
माहिती देताना डॉ. भालचंद्र मुणगेकर हेही वाचा -एल्गार परिषदेतील 'त्या' भाषणावरून वादंग, भाजप नेत्यांकडून कारवाईची मागणी
राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने केंद्र सरकारचे येणारे अंदाजपत्रक आणि शेतकरी आंदोलन या विषयावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात मुणगेकर बोलत होते. अण्णांच्या आंदोलनातील बोलावते धनी कोण? हे आता उघड झाले आहे. अण्णा हजारे यांनी सांगितले होते की, मी आता कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करणार. पण, त्यांनी केले नाही. अण्णा हजारे हे महात्मा गांधी नव्हे. 2011 साली भ्रष्टाचाराविरोधात केलेले अण्णा हजारे यांचे आंदोलन हे प्लॅनिंग करून केलेले आंदोलन होते, अशी टिका मुणगेकर यांनी केली.
आंदोलन केले असते तरी प्रभावी झाले नसते - मुणगेकर
आण्णा हजारे यांनी सांगितले होते की, मी आता आंदोलन करणार आहे. पण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांकडे जाऊन त्यांची मनधरणी केली. जरी अण्णा हजारे यांनी आंदोलन केले असते, तरी ते प्रभावी झाले नसते. मॅनेज होईल आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे व्यक्तिमत्व म्हणजे अण्णा हजारे, अशी टीकाही मुणगेकर यांनी केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह
सर्वोच्च न्यायालयाने शेतकरी आंदोलनाबाबत समिती केली आहे. त्यातील पाचही लोकांचे शेतकरी कायद्याला समर्थन नाही. या समितीत किमान एक तरी शेतकरी नेता हवा होता. पण, तसे केले नाही. ही समिती काय निर्णय घेईल, हे आता स्पष्ट झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे सांगायला पाहिजे होते की हा राजकीय विषय आहे. आम्ही यात दखल देऊ शकत नाही, असेही मुणगेकर म्हणाले.
हेही वाचा -प्रजासत्ताकदिनी कोकणकड्यावर फडकला सर्वात मोठा तिरंगा