महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक 2019 : पुण्यातील नाराज शिवसैनिक मातौश्रीवर... सध्या आठही मतदारसंघ भाजपकडे

पुणे शहरामध्ये शिवसेना टिकवायची असेल तर शिवसेनेला दोन जागा मिळाल्या पाहिजे, अशी मागणी घेऊन  शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी इच्छुक उमेदवार हे आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी मंगळवारी मातोश्रीवर गेले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपले म्हणणे हे सर्वजण मांडणार आहेत. शहरातील 8 विधानसभा मतदारसंघांमध्ये आठही ठिकाणी विद्यमान आमदार हे भाजपचे आहेत. यामुळे या आठही जागा पुन्हा भाजपकडे जाणार असल्याची चर्चा आहे.

विधानसभा निवडणूक 2019 : पुण्यातील नाराज शिवसैनिक मातौश्रीवर...

By

Published : Oct 1, 2019, 1:18 PM IST

पुणे - शहरामध्ये शिवसेना टिकवायची असेल तर शिवसेनेला दोन जागा मिळाल्या पाहिजे, अशी मागणी घेऊन शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी इच्छुक उमेदवार हे आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी मंगळवारी मातोश्रीवर गेले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपले म्हणणे हे सर्वजण मांडणार आहेत. शहरातील 8 विधानसभा मतदारसंघांमध्ये आठही ठिकाणी विद्यमान आमदार हे भाजपचे आहेत. यामुळे या आठही जागा पुन्हा भाजपकडे जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुण्यातील शिवसेना पदाधिकारी हतबल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

हेही वाचा -मंत्रिपद देणार तिकडूनच लढणार; अनिल गोटेंचा सेना प्रवेशाचाही संकेत

पुण्यातील 8 विधानसभा मतदारसंघापैकी किमान 2 मतदारसंघ शिवसेनेला युतीत मिळतील, अशी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यास एकही जागा पदरात पडत नसल्यामुळे शिवसेनेतील इच्छुक बंडखोरीच्या तयारीत आहेत.

हेही वाचा -कट्टर राणे समर्थक सतीश सावंतांचा 'स्वाभिमान'ला रामराम; राणेंना 'होमपीच'वर धक्का!

शिवसेनेला जर एकही जागा मिळाली नाही तर शहरात शिवसेना उरणार नाही, अशी भीती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, 8 पैकी एकही मतदारसंघ मिळत नसल्याने हडपसर विधानसभा मतदार संघातून बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत. तर काही नगरसेवक हे अपक्ष उमेदवारी दाखल करू शकतात, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. एकंदरीतच युती झाल्यानंतर शिवसेना पुणे शहरात मात्र हवालदिल झाल्याचे चित्र तयार झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details