महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Viral Video : काकाने केला पुतण्याला पेटवण्याचा प्रयत्न; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल - nephew on fire at Wagdarwadi

पुरंदर तालुक्यातील वागदरवाडी येथे काकाने पुतण्याला पेटवून देण्याचा प्रयत्न ( Trying to set nephew on fire ) केला आहे. वागदरवाडी येथील काका पुतण्याचं जमिनीवरून वाद ( Attempt to set nephew on fire at Wagdarwadi ) आहे. यावरुन आरोपी भास्कर त्रिंबक भुजबळ यांनी त्यांचा पुतन्या स्वप्नील नानसो भुजबळ यांना पेटवून देण्याचा ( Dispute over land between uncle and nephew ) प्रयत्न केला.

Viral Video
काकाने केला पुतण्याला पेटवण्याचा प्रयत्न

By

Published : Jan 8, 2023, 8:09 PM IST

काकाने केला पुतण्याला पेटवण्याचा प्रयत्न

पुरंदर -पुरंदर तालुक्यातील वागदरवाडी येथे 'काका मला मारू नका' असं म्हणण्याची वेळ एका पुतण्यावर आली आहे. वागदरवाडी येथील काका पुतण्याचं जमिनीवरून वाद ( Attempt to set nephew on fire at Wagdarwadi ) आहे. पुतण्या जमिनीत आल्याचे पाहून काकाने चक्क रॉकेल ओतून पुतण्याला पेटवून देण्याचा प्रयत्न ( Trying to set nephew on fire ) केला. हातामध्ये पेटता टेंभा घेऊन तो पुतण्याच्या अंगावर मारतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर या पुतण्याची आईसुद्धा यामध्ये किरकोळ ( Dispute over land between uncle and nephew ) जखमी झाली आहे.


जेजुरी पोलिसात गुन्हा दाखल - यासंदर्भात जेजुरी पोलिसात भारतीय दंड विधान कलम 307, 324, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वागदरवाडी येथील शारदा नानासाहेब भुजबळ या महिलेन याबाबत फिर्याद दिली आहे . तीने दिलेल्या फिर्यादी नुसार दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी दुपारी घटना घडली आहे.

अंगावर रॉकेल ओतून पेटवून्याचा प्रयत्न - आरोपी भास्कर त्रिंबक भुजबळ यांनी त्यांचा पुतन्या स्वप्नील नानसो भुजबळ यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याच बरोबर पेटत्या टेभ्याने त्याला मारहाण केली. या काका पुतण्याच जमिनीवरून भांडण आहे. काकाने पुतण्याच्या जमिनीत अतिक्रमण करून ऊस लावला आहे.

काकाचा ऊस तोडन्याचा प्रयत्न -ऊस तोडणीला अल्यावर पुतण्याने ऊस तोडण्यास हारकत घेतली होती मात्र, तरी देखील काकान ऊस तोडन्याचा प्रयत्न केला. ही ऊस तोड थांबवण्यासाठी पुतण्या, त्याची आई शेतात आले असता ही घटना घडली. याबाबतचं अधिकचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक कुंडलिक गावडे करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details