पुणे - जागतिक वन्यजीव सप्ताह २०१९ निमित्ताने शहरात वन्यजिवाच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. वनविभाग आणि इनव्हारमेंटल कन्झर्वेशन आँर्गनायझेशन या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
जागतिक वन्यजीव सप्ताहनिमित्त दौडमध्ये वन्यजिवांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन - An exhibition of photographs of wildlife
जागतिक वन्यजीव सप्ताह २०१९ निमित्ताने शहरात वन्यजिवांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
छायाचित्रांचे प्रदर्शन शहरतील अरिहंत शोरुम समोर संस्कार भारती नगरी येथे आयोजीत करण्यात आले होते. ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे वनविभागाचे अधिकारी वैभव भालेराव यांच्या हस्ते पार पडले. यावेळी वन परीक्षेत्र अधिकारी महादेव हजारे साहेब आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रमोदजी खांगल उपस्थितीत होते.
एनव्हारमेंटल कन्झर्वेशन ऑर्गनायझेशन या संस्थेचे अध्यक्ष नचिकेत अवधानी व संस्थेच्या उपाध्यक्ष गायत्री अवधानी यांनी काढलेली छायाचित्र प्रदर्शनामध्ये लावण्यात आली होती. विविध प्राणी, पक्षी, विषारी बिनविषारी साप, किटक कोळी यांची छायाचित्रे प्रदर्शनामध्ये पाहायला मिळाली. दौंड परीसरातील शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी व निसर्ग प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येन प्रदर्शनास भेट दिली.