महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Valse Patil On Amol Kolhe : अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार नाहीत, त्यांच्यात पक्षाविषयी नाराजी नाही - दिलीप वळसे पाटील - Amol Kolhe will not join BJP

शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे ( MP Amol Kolhe ) अमोल कोल्हे हे नाराज नसून ते सातत्याने आमच्याशी चर्चा करत आहे. ते भाजपमध्ये जाण्याची शक्याता नाही. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe ) हे पक्षावर नाराज असून ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यावर दिलीप वळसे पाटील ( Dilip Walse Patil ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Dilip Walse Patil
दिलीप वळसे पाटील

By

Published : Jan 5, 2023, 3:33 PM IST

अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार नाहीत - दिलीप वळसे पाटील

पुणे -गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे ( MP Amol Kolhe ) हे पक्षावर नाराज असून ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री दिलीप वळसे ( Dilip Walse Patil ) पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, अमोल कोल्हे हे नाराज नसून ते सातत्याने आमच्याशी चर्चा करत आहे. ते कुठेही जाणार नाही. येणाऱ्या काळात आम्ही शिरूर मतदार संघाची जागा राखू अस यावेळी पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात बैठक - पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध मतदार संघाची पक्ष प्रमुख शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते.आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या बाबत प्रत्येक तालुका कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. हि रेग्युलर बैठक आहे. कार्यकर्त्याची राजकिय भूमिका बाबत यात चर्चा होणार आहे.

पुणे जिल्ह्यात भाजपला काहीही मिळणार नाही-आगामी निवडणुकीसाठी भाजपने शिरूर, बारामतीकडे लक्ष दिलं आहे. यावर पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, भाजपला जिल्हा परिषद हवी की लोकसभा हवीय. जिल्हा परिषदेच्या बाबतीत पुणे जिल्ह्यात भाजपला काहीही मिळणार नाही. आम्ही विधानसभा, लोकसभा या दोन्ही जागा जिंकू अस देखील यावेळी पाटील म्हणाले.

राज्य सरकारचे अपयश- विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबतीत केलेल्या वक्तव्यावर पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की अश्या पद्धतीने भाजपकडून वादग्रस्त वक्तव्य उपस्थित केले जात आहे.केंद्र, राज्य सरकारचे अपयश लपवण्यासाठी असे विधान केली जार असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबई महापालिकेत दोन आयुक्त दिल्याबाबत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, सत्ताकेंद्र दोन होतील. पण अधिकाऱ्यांच्या अधिकाराबाबत संभ्रम निर्माण होईल. असे पाटील यांनी यावेळी म्हणाले.

खाजगीकरण होणार नाही- वीज कामगारांच्या उपोषणावर पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, वीज विभाजन माझ्या काळात झालं त्यावेळेस सांगितले होते की, आम्ही खाजगीकरण होणार नाही. पण अदानी, सरकार याच काय सुरू आहे? युनियन समजदार आहेत. उपमुख्यमंत्री यांनी काल शद्ब दिलाय खाजगीकरण होणार नाही. अस देखील यावेळी पाटील म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details