पुणे - "उपऱ्यांनी महाराष्ट्रात येऊन विचारू नये पवार साहेबांनी काय केलं", असा टोला लगावत शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मोदी आणि शाह यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
पवार साहेबांनी काय केलं हे 'उपऱ्यां'नी विचारू नये; मोदी-शाहांवर कोल्हेंचा निशाणा
आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी आज घोडेगाव येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. "उपऱ्यांनी महाराष्ट्रात येऊन विचारू नये पवार साहेबांनी काय केलं", असा टोला लगावत शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी मोदी आणि शाह यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
हेही वाचा -शिवसेना-भाजपच्या चुकीच्या जागा वाटपामुळे आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणे अशक्य - अमोल कोल्हे
आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी आज घोडेगाव येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मंचर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर आयेजित महाविजय निर्धार मेळाव्यात डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी, "सीबीआय, ईडीला घाबरायचं कारण नाही, कारण परवा पवार साहेबांना तीच घाबरली' अशी खोचक कोपरखळी वळसे पाटील यांनीही तपास यंत्रणांना लगावली.