पुणे - राष्ट्रवादीतून बाहेर पडणाऱ्या लोकांमुळे उलट पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये वेगळी जिद्द निर्माण झाली आहे. राजकारणात 20 पंचवीस वर्षांनी स्थित्यंतर होत असते, सध्याचा काळ स्थित्यंतराचा आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे.
सध्या राजकीय स्थित्यंतराचा काळ आहे - अमोल कोल्हे - NCP
गुरुवारी पुण्यात 'युवा संवाद' या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यभरातील युवा कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
गुरुवारी पुण्यात 'युवा संवाद' या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यभरातील युवा कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
पुढे बोलताना कोल्हे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमधून काही लोक सध्या बाहेर पडत आहेत. त्यांच्याबाबत काय करायचे, याचा विचार शरद पवार करतील. मात्र, या लोकांच्या जाण्याने पक्षातील तरुण कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची ईर्षा-जिद्द निर्माण झाली आहे. हे कार्यकर्ते मोठ्या जोमाने पक्षासाठी काम करतील, हे येत्या निवडणुकीत दिसून येईल, असा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला.