महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवजन्मोत्सवाला निघालेली शिवज्योत घेऊन धावले अमोल कोल्हे

या तरुणांच्या ताफ्यात जाण्याचा मोह डॉ. अमोल कोल्हे यांना आवरला नाही.

डॉ. अमोल कोल्हे

By

Published : Mar 23, 2019, 7:38 PM IST

पुणे - किल्ले शिवनेरीवर आज तिथीप्रमाणे शिवजन्मोत्सव साजरा होत आहे. राज्यभरातून अनेक शिवभक्त मशाल ज्योत घेऊन शिवनेरीच्या दिशेने शुक्रवारी रात्रीपासून पोहोचत आहेत. आज सकाळच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवनेरीकडे निघालेली शिवज्योत हातात घेऊन शिवनेरीच्या दिशेने प्रवास केला.

डॉ. अमोल कोल्हे


आळंदी येथील प्रचाराची सभा संपल्यानंतर ते पुढे मार्गस्थ होत असताना त्यांनी काही तरुण शिवज्योत घेऊन शिवनेरीच्या दिशेने जात असताना पाहिले. या तरुणांच्या ताफ्यात जाण्याचा मोह डॉ. अमोल कोल्हे यांना आवरला नाही. त्यामुळे डॉ. कोल्हे यांनी आपल्या हातात शिवज्योत घेऊन काही वेळ या तरुणांसोबत प्रवास केला. याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details