महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 7, 2023, 4:19 PM IST

ETV Bharat / state

Amol Kolhe criticism Shivajirao Patil: तुम्ही तर अडचणीत उद्धव ठाकरे यांना सोडलं...मी तर पवार साहेबांच्या सोबतच - अमोल कोल्हे

शिरूरचे माजी खासदार (Former MP from Shirur) शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adharao Patil) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर काही आरोप केले आहेत. यावर कोल्हे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. तुम्ही तर अडचणीत उद्धव ठाकरे यांना सोडलं. मी तर शरद पवार साहेबांच्या सोबतच आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले. (Amol Kolhe criticism Shivajirao Patil)

Amol Kolhe criticism Shivajirao Patil
अमोल कोल्हे

अमोल कोल्हेंची शिवाजीराव पाटील यांच्यावर प्रतिक्रिया

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसममधून बंड पुकारून आता पक्षासह चिन्हावरही दावा केला आहे. (Former MP from Shirur) राज्यातील राष्ट्रवादी काँग्रसचे काही आमदार, खासदार हे अजित पवार यांच्यासोबत तर काही (Shivajirao Adharao Patil) शरद पवार यांच्यासोबत असल्याचे पाहायला मिळत आहे. अश्यातच शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे हे शरद पवार यांच्यासोबत असल्याचे पाहायला मिळाले. (Amol Kolhe criticism Shivajirao Patil)

हा दोघांमधील मूलभूत फरक :यावेळी अमोल कोल्हे यांनी जबाब मिलेगा, करारा जबाब असे, म्हणत शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, वयाचा आदर ठेवतोय. चारवेळा तुम्हाला उद्धव ठाकरेंनी तिकीट दिले. तरी त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांची साथ सोडून आपण स्वार्थासाठी निघून गेलात. पण 2019 ला मला एकदाच शरद पवारांनी तिकीट दिले आणि आज अडचणीच्या काळात ठामपणे मी त्यांच्यासोबत उभा आहे. हा आपल्या दोघांमधला मूलभूत फरक आहे, असे यावेळी कोल्हे म्हणाले.

अभिनय हे माझ्या चरितार्थाचे साधन :अमोल कोल्हे पुढे म्हणाले की, माझ्या अभिनयाविषयी कुचेष्टा केली तर होय. अभिनय हे माझ्या चरितार्थाचे साधन आहे. जनतेला ठाऊक आहे की, माझी अमेरिकेत कोणतीही कंपनी नाही. त्यामुळे पाण्यात म्हैस आणि बाजारात मोल असे करणे योग्य नाही. आपल्यासारख्या वयस्कर नेत्याने या राजकीय घडामोडींचा निषेध करणे अपेक्षित होते. परंतु, ज्या घटनांमध्ये आपणाला संधीसाधूपणा दिसतो, त्याचे वाईट वाटले. 2014 ला मी तुमचा प्रचार केला होता. याचे वाईट वाटले. मीडियासमोर एक बोलून, शरद पवार यांना भेटण्यासाठी आडून-आडून जी दारे ठोठवत आहात, या दाराची किल्ली तर माझ्याकडेच आहे. आपल्या वयाचा मान ठेऊन मी आपले स्वागत करीनच. पण ,सुसंस्कृतपणा राजकारणात हवा. एवढीच अपेक्षा असे देखील यावेळी कोल्हे म्हणाले.

हेही वाचा:

  1. Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : नीलम गोऱ्हेंचा एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश, ठाकरे गटाला जबर धक्का
  2. Pankaja Munde News: दोन महिने सुट्टी घेणार, अंतर्मुख होऊन निर्णय घेणार -पंकजा मुंडे
  3. Maharashtra Political Crisis Update : पंकजा मुंडे यांच्याशी पक्षाचे वरिष्ठ नेते संपर्क करणार-देवेंद्र फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details