महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात लोकसभा उमेदवारीसाठी मनसेतून वसंत मोरे, साईनाथ बाबरची बॅनरबाजी, अमित ठाकरेंच्या नेतृत्वाचा लागणार कस - पुणे लोकसभा निवडणुकीबाबत अमित ठाकरे

Amit Thackeray On Pune Lok Sabha Election: मनसे कडून पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पुणे लोकसभेची जबाबदारी अमित ठाकरे यांच्यावर दिलेली आहे; (Pune Lok Sabha Elections) मात्र पुण्यात लोकसभेची उमेदवारी ठरवताना अमित ठाकरेंची डोकेदुखी वाढणार असल्याचं चित्र आता जाणवत आहे. (Amit Thackeray Pune Meeting) कारण पुणे लोकसभा मतदार संघातून वसंत मोरेंचे समर्थक आणि शहराध्यक्ष साईनाथ बाबर या दोघांनीही मनसेच्या लोकसभा उमेदवारीवर दावेदारी ठोकली आहे. या दोघांच्याही समर्थकांनी बॅनरबाजी करून राजकीय वातावरण तापविले आहे.

Amit Thackeray On Pune Lok Sabha Election
वसंत मोरे बॅनर

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 9, 2023, 6:29 PM IST

पुणे लोकसभा निवडणुकीसाठी मनसेकडून वसंत मोरेंची मोर्चेबांधणी

पुणेAmit Thackeray On Pune Lok Sabha Election:उच्च न्यायालयाने कालच निवडणूक आयोगाला पुणे लोकसभेची निवडणूक का घेतली नाही अशी विचारणा केलेली आहे. (Vasant More) त्यानंतर पुण्यात आता मनसे कडून इच्छुक उमेदवार म्हणून वसंत मोरेच्या कसबा विधानसभा मतदारसंघात मनसेचे कसबा प्रमुख गणेश भोकरे यांनी वसंत मोरेंना सक्षम नेतृत्व संबोधत त्यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली आहे. तर काही दिवसांपूर्वी शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) यांनीसुद्धा लोकसभेसाठी मला पक्षाने संधी दिल्यास लढवणार असल्याचं म्हटलं आहे. (MNS Candidates Banner Battle in Pune)

बैठकीच्या अगोदरच उमेदवारीवरून बॅनरबाजी :त्या संदर्भातच आज महत्त्वाची बैठक पुण्यात अमित ठाकरे यांनी बोलवली होती. सर्व विभाग प्रमुखांना लोकसभा संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याच दिवशी हे बॅनर लागल्यानं आता मनसेची डोकेदुखी वाढणार आहे. यापूर्वीसुद्धा वसंत मोरे यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लागले होते; ते त्यांच्या भागातील कात्रज भागातील कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले होते. या अगोदर कधीही शहराच्या मध्यवर्ती भागात कुठल्या कार्यकर्त्यांकडून अशी बॅनरबाजी केली जात नव्हती. पण प्रथम आज एका विभागाच्या अध्यक्षांनी आता संपूर्ण कसबा मतदारसंघात अशी बॅनरबाजी केली आहेत.

वसंत मोरे बारामती लोकसभा लढवण्यास इच्छुक:पुण्यात मनसेचे शहराध्यक्ष पद हातातून गेल्यानंतर वसंत मोरे आणि शहर पदाधिकारी असे दोन गट पडले होते. त्यानंतर अनेक वेळेस यांचे वादसुद्धा समोर आले होते. वसंत मोरे मध्यंतरी बारामती लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यानंतर मात्र शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी वसंत मोरे यांनी जशी इच्छा व्यक्त केली तशी त्यांनी पुण्यातून इच्छा व्यक्त केली. त्यामुळे पुण्यातील अंतर्गत मनसेचा वाद किती मोठा आहे हे लक्षात येतं.

तर पुणेकर वसंत मोरेंना निवडून देतील:पुणे लोकसभेसाठी अमित ठाकरे आजसुद्धा विभाग प्रमुखांची बैठक घेत आहेत. या निवडणुकीत अमित ठाकरेंच्या नेतृत्वाचीसुद्धा परीक्षा आहे. त्यामुळे वसंत मोरे आणि साईनाथ बाबर याच्या बाबतीत अमित ठाकरे कसा तोडगा काढतात हे पाहावं लागेल. त्याचबरोबर कोणता उमेदवार लोकसभा लढवेल याबाबत पक्ष अंतिम निर्णय घेईल. परंतु वसंत मोरे यांनी ज्याप्रमाणे राज ठाकरे यांनी एक ब्लू प्रिंट राज्याला दिली. तसेच त्यांनी शहरात काम केलेलं आहे. गोरगरिबांसाठीसुद्धा काम केलेलं आहे. पुणेकर नक्की वसंत मोरे यांना निवडून देतील. त्यासाठी आम्ही हे बॅनर लावले आहेत. आम्ही ही भूमिका अमित ठाकरे यांच्या समोरसुद्धा मांडणार असल्याचं कसबा विधानसभेचे मनसे अध्यक्ष गणेश भोकरे यांनी म्हटलं आहे.

वसंत मोरे लोकसभेचे खासदार व्हावे:अंतिम निर्णय राज ठाकरे, अमित ठाकरे सर्व नेते मिळून घेतील. पण आमची इच्छा आहे की वसंत मोरे यांच्या सारखा नेता लोकसभेचा खासदार व्हावा, अशी प्रतिक्रियासुद्धा गणेश भोकरे यांनी दिलेली आहे. गेल्या वेळेस मनसेला 2019 मध्ये दहा टक्के मतदान लोकसभेला झालं होतं. जवळपास 75 हजार मते लोकसभेत मनसेने घेतली होती. त्यानंतर आता अंतर्गत गटबाजी न होता मनसे कुणाला तिकीट देणार हे पाहावं लागेल; परंतु कार्यकर्त्यांकडून मात्र आपापल्या पद्धतीनं शक्ती प्रदर्शन आणि बॅनरबाजी सुरू झाली आहे.

हेही वाचा:

  1. आमदार अपात्र प्रकरण: शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंची उलट तपासणी पूर्ण, सोमवारी दीपक केसरकर यांचा नंबर
  2. भाजपाच्या नैतिकतेबद्दल खिचडी चोरांच्या सल्ल्याची गरज नाही - नितेश राणे
  3. भाजपाला वोट दिलं म्हणून मुस्लिम महिलेला मारहाण, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

ABOUT THE AUTHOR

...view details