केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कार्यक्रमात बोलताना पुणे :निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा काल निर्णय घेतल्यानंतर राज्यभर विविध नेते मंडळी कडून यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील कालच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने दूध का दूध पाणी का पाणी केले. कालच सत्यमेव जयते झाले आहे, असे यावेळी अमित शाह म्हणाले.
मोदी @20 पुस्तकाचे प्रकाशन: मोदी @ 20 या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन देशाचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी 1मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, माजी खासदार प्रकाश जावडेकर आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
उद्धव ठाकरेंवर केली टीका: गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, काल खूपच मोठा विजय आमच्या युतीला मिळाला आहे. शिंदे यांना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले आहे. जे लोक खोटे आधार घेऊन बोलत होते त्यांना कळाले की सत्याचा विजय झाला आहे आणि सत्य कोणाच्या बरोबर आहे. निवडणुकीत मी पक्षाचा अध्यक्ष असताना ठरले होत की निवडणूक एकत्र लढू. प्रचारात मोठा फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लावले आणि देवेंद्र फडणवीस यांना नेते मानून ही निवडणूक लढवा असे ठरले होते. पण मुख्यमंत्री बनण्याची वेळ आली तेव्हा विरोधकांचे तळवे चाटले आणि आज त्यांना सत्य काय आहे हे कळाले असल्याची टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली.
लोकसभा निवडणूक जिंकण्याचा संकल्प: गृहमंत्री शाह पुढे म्हणाले की, सर्वांनी आज एक संकल्प करायचा आहे की लोकसभेत सर्वच्या सर्व जागा शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांना जिंकून द्यायच्या आहे. निवडणुकीत विजय पराजय हा होत असतो पण जी लोक धोका देत असतात त्यांना कधीही माफ करायचे नाही. आमची सोडा पण यांनी यांनी बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा आणि शिवसैनिकांबरोबर देखील धोका केला आहे. त्यामुळे आज दूध का दूध पाणी का पाणी झाला आहे, असे यावेळी शाह म्हणाले.
पुस्तक प्रकाशनावर काय म्हणाले? : गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, काल निवडणूक आयोगाने दूध का दूध पाणी का पाणी केले. कालच सत्यमेव जयते झाले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मोदी @ 20 या पुस्तकाचे जेव्हा प्रकाशन होते तेव्हा ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होत असते पण आज मराठीत जे अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. ते सर्वसामान्य नागरिकांच्या उपस्थित होत आहे, हे खूप चांगली बाब आहे. देशाच्या लोकशाहीला सफल कस बनविला हे जर समजायचे असेल तर ते या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळेल. देशात अनेक सत्ता आल्या, यामध्ये अनेक पंतप्रधान झाले. पण मोदी @20 हे पुस्तक मोदीजी यांच्या जीवनावर आधारित पुस्तक नाहीये. भारतीय जनता पक्षाच्या यशाचे हे पुस्तक नाही तर भारताच्या समस्या आणि त्यावर उपाय यावर हे लिहिलेले पुस्तक आहे, असे कौतुक शाह यांनी केले.
पंतप्रधानांचे केले कौतुक: पुढे ते म्हणाले की, 2001 ते 2014 पर्यंत गुजरातच मुख्यमंत्री म्हणून मोदीजी यांनी काम केले. त्यांच्या बरोबर मंत्रिमंडळात मी देखील काम केले आणि गुजरातला सर्वश्रेष्ठ करण्याचे काम त्यांनी केले. गुजरातमध्ये सुरूवातीला विविध विकास कामे करण्यात आले. हे करता करता ते ब्रँड अॅंबेसिटर बनले. आणि मग पक्षाने ठरविले की पंतप्रधान म्हणून मोदीजी यांना पुढे करायचे. तेव्हा देशात यूपीए सरकारने काम केले. प्रत्येक व्यक्ती हा तेव्हा पंतप्रधान समजत होते पण पंतप्रधान यांना ते पंतप्रधान समजत नव्हते. आज हे सगळ चित्र बदलले आहे. जे लोक बोलत होते की 370 कलम हटवली तर रक्ताच्या नद्या वाहतील. पण आज काश्मीरमध्ये पाहावे की कोणाची दगड मारायची देखील हिमंत नाही, असे देखील यावेळी शाह म्हणाले.
हेही वाचा:Devendra Fadnavis Pune : उपमुख्यमंत्री फडणवीसांची मविआवर टीका; म्हणाले, आमचे 'डबल हॉर्सपॉवर' सरकार...