पुणे -दोन समाजात तेढ निर्माण करत समाजात भावना भडकवल्या प्रकरणी समस्त हिंदु आघाडीचे मिलींद एकबोटे ( Hindu Aghadi Milind Ekbote ) यांच्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Fir Filed Againt Milind Ekbote Pune ) मिलिंद एकबोटे यांच्यासह पतीत पावन संघटनेचे स्वप्नील नाईक यांच्यासह इतर २० जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Pune Police on Milind Ekbote ) रात्री उशिरा या सर्व प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
एकूण १५ जणांना अटक
याप्रकरणी पुण्यात फरासखाना पोलीस ठाण्यात एकूण २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील १५ जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, अद्याप मिलिंद एकबोटे यांना अटक झाली नाही, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली.