पुणे:पुण्याचा राजकीय संस्कृती ठरलेल्या आकर्षणाचा कार्यक्रम म्हणजे वाडेश्र्वर कट्टा. पुण्यात कुठलीही निवडणूक जाहीर झाली की अगोदर वाडेश्वर कट्ट्यावर सर्व पक्ष नेत्यांचा स्नेह मेळावा होत असतो. तसेच आपली कटुता ही निवडणुकीमध्ये जास्त टोकाला जाऊ नये, याची काळजी घेण्याचे काम पुण्यात करण्यात येते. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक असलेले शैलेश टिळक, धीरज घाटे, हेमंत रासने या उमेदवारांची हजेरी होती. तर शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे, विशाल धनवडे, संजय मोरे हे देखील यावेळी उपस्थित होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अंकुश काकडे, काँग्रेसकडून रवींद्र धगेकर, कमल व्यवहारे, बाळासाहेब दाभेकर हे सर्वपक्षीय वाडेश्वर कट्ट्यामध्ये सहभाग होते.
मतभेद राजकीय: पुढच्या काही दिवसांमध्ये या सगळ्यांच्या जाहीर सभा होतील. यामध्ये एकमेकांवर टीका केली जाईल. आरोप प्रत्यारोप केले जातील. विकासाविषयी बोलले जाईल परंतु यामध्ये कुठलीही कटुता येऊ नये त्यासाठी अगोदरच एकत्र जेवण करणे, एकत्र नाश्ता करणे आणि आपल्यातील मतभेद हे राजकीय आहेत वैयक्तिक नाहीत हा संदेश देण्याचा प्रयत्न यातून दरवर्षी करण्यात येतो. याचे मुख्य आयोजन राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे करत असतात या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती असते. पुण्यामध्ये या ठिकाणी प्रत्येक जण आपले मत कसबा विधानसभा मतदारसंघाविषयी मांडले आहेत. प्रत्येकाने मी विजयी होईल पक्षाने संधी दिली पाहिजे अशा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. परंतु महाविकास आघाडी किंवा माहिती म्हणून जे काही निर्णय वरिष्ठ स्तरावरून येतील ते आम्हाला मान्य असल्याचे त्यावेळी या उमेदवाराने सांगितलेला आहे.
तिकीट दिले तर चांगलेच: भाजपाचे मुख्य दावेदार असलेले शैलेश टिळक यांनी आपली भूमिका मांडताना कुटुंबातील व्यक्तीला साधारणपणे तिकीट दिल्यानंतर विरोध होणार नाही. परंतु मुक्ताताई टिळक यांचे राहिलेले काम पूर्ण करता यावे यासाठी कुटुंबातील व्यक्तींना तिकीट दिले तर ते चांगलेच आहे अशी भावना यावेळी त्यांनी मांडली आहे. तर भाजपाचे जे इतर दावेदार आहेत त्यामध्ये नगरसेवक धीरज घाटे, हेमंत रासने यांनी सुद्धा आपली इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाने आपल्याला संधी द्यावी आणि त्यामुळे आम्हीही उमेदवारी मागितलेली आहे अशा भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केले आहेत.