महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील इतर धरणांमधील गळतीही टेमघर पॅटर्ननुसार बंद करण्यात येणार, जलसंपदा मंत्र्यांची माहिती - temghar pattern

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी टेमघर प्रकल्पाची पाहणी केली. तर, राज्यातील इतर धरणांमधील गळती देखील टेमघर पॅटर्ननुसार बंद करण्यात येणार असल्याचेही गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.

टेमघर

By

Published : Sep 1, 2019, 2:06 AM IST

Updated : Sep 1, 2019, 5:25 AM IST

पुणे - राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी टेमघर प्रकल्पाची पाहणी केली. तर, राज्यातील इतर धरणांमधील गळती देखील टेमघर पॅटर्ननुसार बंद करण्यात येणार असल्याचेही गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील इतर धरणांमधील गळतीही टेमघर पॅटर्ननुसार बंद करण्यात येणार


सन 2016 मध्ये टेमघर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महाजन यांनी धरणाच्या दुरुस्तीचे आदेश दिले होते. त्यानंतर जलसंपदा विभागाच्या वतीने गेल्या 2 वर्षांपासून गळती प्रतिबंधक कामे हाती घेण्यात आली होती. या कामांची पाहणी करण्यासाठी महाजन यांनी शुक्रवारी टेमघर धरण प्रकल्पाचा दौरा केला.


टेमघर धरण गळतीमुक्त करण्यासाठी ग्राऊंटींग व शॉर्टक्रीट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाला धरणाची गळती रोखण्यात यश आले आहे. तर, राज्यातील इतर धरणांमधील गळती देखील टेमघर पॅटर्ननुसार बंद करण्यात येणार असल्याचे महाजन यांनी यावेळी सांगितले आहे.


त्याप्रमाणेच टेमघर धरण डिसेंबर 2019 पर्यंत रिकामे करून उर्वरित गळती प्रतिबंधक कामे पूर्ण करण्याचे निर्देश देखील महाजन यांनी दिले आहेत.

Last Updated : Sep 1, 2019, 5:25 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details