महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी अजित पवारांची पाडवा कार्यक्रमाला अनुपस्थिती; शरद पवारांचे स्पष्टीकरण - Ajit pawar absence

दिवाळी पाडव्याला पवार कुटुंबियांचा स्नेहमेळावा पार पडतो. गेल्या ५० वर्षांपासून पवार कुटुंबिय दिवाळीला एकत्र येत असतात. गेल्या काही वर्षांपासून दिवाळी पाडव्याला भेटीचा प्रघात सुरु झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे हा स्नेहमेळावा झालेला नव्हता. यंदा स्नेहमेळावा होत असला तरी कोरोनामुळे सोशल डिस्टंसिंग राखले जावे यासाठी गोविंदबाग या पवारांच्या निवासस्थाना ऐवजी अप्पासाहेब पवार सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

शरद पवारांनी दिले 'हे' स्पष्टीकरण...
शरद पवारांनी दिले 'हे' स्पष्टीकरण...

By

Published : Nov 5, 2021, 12:56 PM IST

Updated : Nov 5, 2021, 4:59 PM IST

बारामती - गेली दोन वर्षे खंड पडलेल्या दिवाळी पाडवा स्नेहमेळाव्यानिमित्त बारामतीत पवार कुटुंबिय शुक्रवारी नागरिकांना भेटून दिपावली शुभेच्छा स्विकारत आहे. यंदा प्रथमच या स्नेहमेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती आहे. अजित पवार यांना कोरोनाची शक्यता आहे. त्यामुळे ते स्नेहमेळाव्याला अनुपस्थित असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिले.

पवार कुटुंबीयांच्या दिवाळी पाडव्याला अजित पवारांची अनुपस्थिती

रिस्क नको...

दिवाळी पाडव्याला पवार कुटुंबियांचा स्नेहमेळावा पार पडतो. गेल्या ५० वर्षांपासून पवार कुटुंबिय दिवाळीला एकत्र येत असतात. गेल्या काही वर्षांपासून दिवाळी पाडव्याला भेटीचा प्रघात सुरु झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे हा स्नेहमेळावा झालेला नव्हता. यंदा स्नेहमेळावा होत असला तरी कोरोनामुळे सोशल डिस्टंसिंग राखले जावे यासाठी गोविंदबाग या पवारांच्या निवासस्थाना ऐवजी अप्पासाहेब पवार सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान राज्यातील खासदार, आमदार, नेतेमंडळी, कार्यकर्त्यांनी बारामतीत पवारांना भेटण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. खासदार पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार शुभेच्छांचा स्विकार केला आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कदाचित कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. घरातील दोन कामगार व गाडीचा चालक यांना देखील कोरोना झाल्यामुळे रिस्क नको म्हणून आजच्या गर्दीवेळी त्यांनी येऊ नये, असे आम्ही त्यांना सांगितले असल्याचे पवार म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा -

एसटी कर्मचाऱ्यांच्या काही संघटनांनी आम्हाला संप पुढे न्यायचा नाही असे सांगितले आहे. एसटी संकटात आहे हे आम्हाला ठावूक आहे. दिवाळीच्या सणात लोंकाना त्रास होवू नये ही आमची भूमिका आहे पण काही लोंकानी टोकाची भूमिका घेतली त्यामुळे संप सुरु आहे. ८५ टक्के बसेस रस्त्यावर आहेत, १५ टक्के लोकांनी संपाची भूमिका घेतली आहे. संस्थेच्या आणि लोंकाच्या हितासाठी हा विषय एकदाचा संपवावा. कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असे आवाहन खासदार शरद पवार यांनी केले आहे. पवार म्हणाले, कोरोनाच्या संकटामुळे काही पथ्य पाळावी लागत आहेत. राज्य सरकार अनेक महत्वाचे निर्णय घेत आहे. याचा परिणाम कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होते आहे. यंदाची दिवाळी भेटावे का नाही असे वाटत होते. मात्र भेटीचा आनंद घेता आला पाहिजे. आज मास्क लावून सोशल डिस्टंसिंग ठेवून शुभेच्छा घेतल्या शुभेच्छा दिल्या याचे समाधान आहे. मागील कोरोना काळात पूर्ण आर्थिक नुकसान झाले. आता उद्योग व्यवसाय पूर्वपदावर येत आहेत. त्यातून नुकसान भरुन निघून दिलासा मिळेल.

केंद्राने जीएसटी तात्काळ द्यावा -

केंद्र सरकारने राज्याला जीएसटी रक्कम तात्काळ द्यावी. ही रक्कम मिळाल्यास राज्य सरकारला लोकांना मदत करणारा निर्णय घेणे शक्य होईल, असेही पवार म्हणाले.

Last Updated : Nov 5, 2021, 4:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details