पुणे - पंढरीच्या सावळया विठुरायाच्या भेटीसाठी शेकडो वर्षापासून निघणारी पालखी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे सावट कायम आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार येत्या शुक्रवारी बैठक घेणार आहेत. या बैठकीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
महाराष्ट्राची आध्यात्मिक परंपरा असलेला पालखी सोहळा दरवर्षी नित्यनेमाने आळंदी आणि देहूमधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतो. वीस दिवसांच्या काळात वाटेवरच प्रत्येक गाव टाळ, मृदंग आणि अभंगात तल्लीन होते. गतवर्षी कोरोनाच्या संकटामुळे सार्वजनिक पालखी सोहळा रद्द करण्यात आला. यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदादेखील सार्वजनिक पालखी सोहळा रद्द होणार की नाही, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार बैठक घेणार आहेत.