पुणे- पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेत शहरात दोन जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येत आहेत. नेहरू नगर येथे उभारण्यात येत असलेल्या कोविड सेंटरला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. कामाचे कौतुक करत लवकरात लवकर कोविड सेंटर उभारा, अशा सूचना महानगरपालिका अधिकाऱ्यांना अजित पवार यांनी दिल्या आहेत. राजस्थान आणि महाराष्ट्र येथील दोन टीम कोविड सेंटर उभारत आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील जम्बो कोविड सेंटरची अजित पवारांनी केली पाहणी - पिंपरी चिंचवड न्यूज
पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात दोन जम्बो कोविड सेंटर उभारले जात असून नेहरू नगर येथील सेंटरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन पाहणी केली आणि काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
अजित पवार हे कोविड सेंटर ची पाहणी करत असताना कामगारांची त्यांनी चौकशी केली. सध्या राज्यात कामगारांचा तुटवडा असल्याने हे कामगार कोणत्या ठिकाणचे असल्याचं विचारत मराठी कामगारांची देखील त्यांनी चौकशी केली. याविषयी पालिका अधिकाऱ्यांनी मुंबई आणि कोकण येथील कामगार असल्याचे सांगत राजस्थान येथील काही नागरिक देखील काम करत असल्याचं त्यांनी अजित पवार यांना सांगितले.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात बाधित रुग्णांची संख्या 26 हजारांच्या पुढे गेली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहेच, याच पार्श्वभूमीवर शहरात दोन जम्बो कोविड सेंटर उभारले जात असून नेहरू नगर येथील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन युक्त 616 तर 200 आयसीयू बेड असतील, अशी माहिती महानगर पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.