बारामती- राज्यात अद्यापही कोरोनाचे सावट कायम आहे. कोरोनाचा प्रसार खोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसह लहान मुलांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, याची खबरदारी घेतली जात आहे. लसीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवायचा असून त्यासाठी साडेसहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना संदर्भात आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
देशातील लस निर्मिती कंपन्यांकडून अपेक्षित लसींचा पुरवठा नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार - pune vaccination
बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना संदर्भात आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
परदेशातील लस आणण्याची परवानगी द्यावी -
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, 'दुर्दैवाने आपल्या देशातील लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून अपेक्षित पुरवठा होत नाही. केंद्र सरकारचे ४५ वर्षे वयोगटावरील नागरिकांना लसीकरण देण्याचे धोरण होते. तसेच त्या-त्या राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील वर्गाला मोफत लसीकरण देण्याचे धोरण ठरविले होते. मात्र तेवढी पूर्तता होत नसल्यामुळे या अडचणी सोडवण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करण्यात येत आहे की, परदेशातील जी लस योग्य आहे. ती लस आणण्याची आणि देण्याचीही परवानगी द्यावी', असे म्हणाले.