बारामतीविरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) दोन दिवसांपासून बारामती दौऱ्यावर आहेत. बारामती शहरात त्यांचे विविध कार्यक्रम पार पडत आहेत. बारामतीमधील एका कार्यक्रमात पवारांनी थेट पंतप्रधान मोदींना (Ajit Pawar scolded PM) डिवचलं. आईला भेटायला जातो...पण फोटो काढत नाही. अशी मिश्कील टिप्पणी अजित पवारांनी केली. यामुळे अजित पवारांची मिश्कील शैली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
व्यसनांपासुन दुर रहा- पवारसध्या कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येकाने गुटखा, तंबाखू, सिगारेट, बिडी, दारू या व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. असा सल्ला विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बारामतीत बोलताना दिला. पवार म्हणाले की, माणसाला आयुष्यात एकदा जीवन मिळत असतं. आपल्याला आई-वडिलांनी जन्म दिल्यानंतर व्यसनाच्या आहारी न जाता आपण आपलं आयुष्य सार्थकी लावले पाहिजे. असे पवार म्हणाले.