महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अजित पवारांची खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका; हे राजीनामा द्यायला निघाले होते, यांच्यासाठी वळसेंसह मी जिवाचं रान केलं - Farmers protest march in pune

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी सर्किट हाऊस येथे बैठक घेतली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर आपलं मत व्यक्त केलं. अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे.

Ajit Pawar
अजित पवार

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 25, 2023, 2:39 PM IST

Updated : Dec 25, 2023, 2:59 PM IST

अजित पवार

पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली येत्या 27 तारखेपासून शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, चांगली गोष्ट आहे पण त्यातील एका खासदाराने मतदार संघात लक्ष घातलं असतं तर खूपच बरं झालं असत. तो खासदार दीड वर्षापूर्वी माझ्याकडे आला होता की मला राजीनामा द्यायचा आहे. त्या खासदाराला उमेदवारी मी दिली आणि त्या खासदाराला निवडून आणण्यासाठी जिवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. ते मधल्या काळातही 6 ही विधानसभा मतदार संघात फिरले देखील नव्हते. ते राजीनामा देत म्हणत होते की, मी एक कलावंत आहे, माझे सिनेमा चालत नाहीत. पण आत्ता त्यांना उत्साह आला आहे कारण निवडणुका जवळ आल्या आहे. कोणाला पदयात्रा सुचत आहे तर कुणाला संघर्ष यात्रा सुचत आहे, अशी टीका यावेळी अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर केली आहे.



योग्य पद्धतीने उमेदवारी देण्यात आली : "त्यांना यात्रा काढू द्या मी देखील 6 ही मतदार संघात सांगणार आहे की यांची काय भूमिका होती. लोकांनी त्यांना किती वेळा मतदार संघात पाहिलं आहे. तसंच त्यावेळेस त्यांना उमेदवारी देताना योग्य पद्धतीने उमेदवारी देण्यात आली होती. पण वर्ष दोन वर्षातच ते ढेपाळले. निवडून दिल्यावर काम कशा पद्धतीने करायचं ते ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण ते केलं नाही. आत्ता तिथं दिलेला उमेदवार हा जिंकूनच आणतो" असं यावेळी अजित पवार म्हणाले.


फळं आणि पिकांचे नुकसान : पाण्याच्या बाबतीत अजित पवार म्हणाले की, "पाण्याचे साठे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. राज्यात सगळीकडे अशी परिस्थिती आहे. याबाबत कॅबिनेट मध्ये पाण्याची परिस्थिती सांगितली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत. पाणी पिण्याला द्या आणि नंतर शेतीला द्या. जलसंपदा विभागाला सुद्धा सूचना दिल्या आहेत. तसंच गेल्या वर्षीच्या तुलनेत पाण्याची पातळी पुण्यात कमी आहे. अवकाळी पावसामुळे अनेक फळं आणि पिकांचं नुकसान झालं आहे. तात्काळ पंचनामे सुरू झाले आहेत."



शेवटी आत्ता तरी नरेंद्र मोदी : "वंचित बहुजन आघाडी लोकसभेचे 48 जागा लढवणार आहे. याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की मी काही ज्योतिषी नाही. शेवटच्या क्षणापर्यंत या गोष्टी चालत असतात. महायुतीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत. मात्र समोर कोण पंतप्रधान पदाचे उमेदवार आहे हे देखील माहीत नाही. मोदी पाहिजे का समोरची व्यक्ती पाहिजे याची तुलना मतदार करतील. शेवटी आत्ता तरी नरेंद्र मोदी यांच्या शिवाय पंतप्रधान पदाचा योग्य उमेदवार दुसरा कोणी पाहायला मिळत नाही." असं देखील यावेळी अजित पवार म्हणाले. कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की "आमच्या मंत्रिमंडळातील एका सहकाऱ्याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. पाठीमागे जी तीव्रता होती ती आता नाही. यात काळजी घेणे, मास्क लावणे, फार जवळ येऊन न बोलणं याची खबरदारी घेतली पाहिजे. तज्ञ डॉक्टरांच्या मते घाबरून जाऊ नये, मात्र काळजी घेतली पाहिजे असं यावेळी अजित पवार म्हणाले.

हेही वाचा :

  1. फार्महाऊसवर दरोडा टाकून दागिन्यांसह ५५ सोयाबीनचे पोते लंपास, विरोध करणाऱ्या तरुणाच्या पोटात खुपसला चाकू
  2. माईंच्या संस्थेतील वाद व्यक्तिगत स्तरावर गेल्याचं क्लेशदायक, चर्चेतून मार्ग काढू : ममता सपकाळ
  3. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींसह पंतप्रधानांनी केले अभिवादन, देशात 'सुशासन दिन' होतोय साजरा
Last Updated : Dec 25, 2023, 2:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details